अंत्यसंस्कारासाठी गेले होते लोक, महिलेला चितेवर ठेवणार तेवढ्यात ओरडली आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:35 PM2024-02-14T16:35:02+5:302024-02-14T16:35:15+5:30
महिला जोरात ओरडली. जे बघून लोक घाबरले. बरेच लोक तिथून पळू लागले. नंतर तिचा आवाज ऐकून लोक तिच्याजवळ आले तेव्हा पाहिलं तर महिलेचा श्वास चालू होता.
ओडिशाच्या बरहामपूरमधून एक अजब घटना समोर आली आहे. आगीत होरपळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तिला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं. लाकडं तयार होती फक्त मृतदेह त्यावर ठेवायचा होता. तेव्हाच महिला जोरात ओरडली. जे बघून लोक घाबरले. बरेच लोक तिथून पळू लागले. नंतर तिचा आवाज ऐकून लोक तिच्याजवळ आले तेव्हा पाहिलं तर महिलेचा श्वास चालू होता.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, महिलेचा पती सिबाराम पालोने सांगितलं की, 1 फेब्रुवारीला त्याची पत्नी बुज्जी अम्मा आगीत होरपळली होती. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोन दिवस तिच्यावर उपचार झाले. पण पैसे नसल्याने तिला घरी परत आणलं. औषधे देत राहिले. 12 फेब्रुवारीला सकाळी तिला उठवण्यासाठी गेलो तर ती उठली नाही. गावातील लोकांना सांगितलं. त्यांनी येऊन पाहिलं तर तिच्या शरीरात प्राण नव्हता. लोकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली.
चिता तयार केली होती. जेव्हा तिचा मृतदेह गाडीतून काढण्यात आला महिला जोरात ओरडली त्यामुळे सगळे घाबरले. तिथून पळू लागले. परिवारातील एका व्यक्तीने सांगितलं की, आम्ही घाबरलो होतो कारण अशी घटना आम्ही याआधी कधी बघितली नव्हती. फक्त गोष्टी ऐकल्या होत्या.
सिबारामने सांगितलं की, जेव्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी पोहोचलो तेव्हा आमचा विश्वास बसला नाही. महिलेचा श्वास सुरू होता. ती जिंवत होती. तेव्हा सगळे तिच्याजवळ पोहोचले. गाडी पुन्हा मागवण्यात आली आणि तिला घरी घेऊन आलो. आता तिची स्थिती तशीच आहे.