अंत्यसंस्कारावेळी महिलेने आतून वाजवली शवपेटी, शोकसभेत उपस्थित लोकांना बसला धक्का....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 06:05 PM2022-05-03T18:05:07+5:302022-05-03T18:08:19+5:30

Peru : पेरूच्या लांबाइकमध्ये रोजा इसाबेस स्पेस्पेडेस कैलाकाला एका कार अपघातानंतर मत घोषित करण्यात आलं होतं. पण त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्यांच्या शवपेटीतून खटखट असा आवाज येऊ लागला होता.

Dead woman knocked the coffin from inside the people present in the condolence meeting were in fear | अंत्यसंस्कारावेळी महिलेने आतून वाजवली शवपेटी, शोकसभेत उपस्थित लोकांना बसला धक्का....

अंत्यसंस्कारावेळी महिलेने आतून वाजवली शवपेटी, शोकसभेत उपस्थित लोकांना बसला धक्का....

Next

Woman Knocked the Coffin: जेव्हा कधी कुणाचं हे जग सोडून जातं तेव्हा लोकांना वाटत असतं की, पुन्हा त्या व्यक्तीची निदान एका क्षणासाठी तरी भेट व्हावी. पण विचार करा की, जर एखाद्या व्यक्तीची शोकसभा सुरू आहे आणि ती मृत व्यक्ती अचानक उठून बसली तर? अर्थातच कुणालाही हे वाचून आश्चर्य वाटेल. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका कार अपघातात मृत्यू झालेल्या महिलेने शवपेटी वाजवून लोकांना धक्का दिला.

पेरूच्या लांबाइकमध्ये रोजा इसाबेस स्पेस्पेडेस कैलाकाला एका कार अपघातानंतर मत घोषित करण्यात आलं होतं. पण त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्यांच्या शवपेटीतून खटखट असा आवाज येऊ लागला होता. अशात तिथे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित लोक हैराण झाले. म्हणजे रोजा इसाबेलने शवपेटीतून आवाज करून परिवारातील सदस्यांना अवाक् केलं.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, एक भयावह दुर्घटनेनंतर रोजा यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. या घटनेत रोजासोबत तिच्या भावोजींचाही जीव गेला होता. चिकलायो-पिक्सी रोडवर झालेल्या घटनेत त्यांचे तीन भाचेही गंभीरपणे जखमी झाले होते.

या घटनेनंतर गेल्या मंगळवारी २६ एप्रिलला त्यांच्या अंत्यसंस्काराआधी रोजा यांना एका शवपेटीत ठेवण्यात आलं होतं. पण जेव्हा अंत्ययात्रेची सुरूवात जाली तेव्हा काही वेळातच लोकांना एक वेगळाच आवाज ऐकू आला. हा आवाज शवपेटीतून येत होता. अशात उपस्थित लोक घाबरले. रोजाच्या ज्या नातेवाईकांनी शवपेटी खांद्यावर घेतली होती त्यांनी ती लगेच खाली ठेवली. त्यांनी शवपेटी उघडून पाहिली तर महिला जीवंत होती.

स्मशानभूमीत काम करणारा जुआन सेंगुडो काजोने या घटनेबाबत सांगितलं की, 'तिने तिचे डोळे उघडले आणि ती घामाने पूर्णपणे भिजलेली होती. मी लगेच ऑफिसमध्ये गेलो आणि पोलिसांना फोन केला'. मेट्रोच्या रिपोर्टनुसार, तिच्या परिवाराने शवपेटी उचलली आणि महिलेला लांबायेकच्या रेफरेंशिअल हॉस्पिटल फेरेनाफेमध्ये नेण्यात आलं. जिथे रोजावर उपचार सुरू झाले. रोजा यांना डॉक्टरांनी लाइफ सपोर्टिंग सिस्टीमवर ठेवलं. कारण त्यांना दिसलं की, रोजा फार कमजोर आहेत. पण काही तासांनीच त्यांचा मृत्यू झाला.

आता रोजा यांचा परिवार आरोग्य विभागाकडे याचं उत्तर मागत आहेत की, रोजाला आधी मृत घोषित का करण्यात आलं? महिलेच्या नातेवाईकाने सांगितलं की, 'आम्हाला जाणून घ्यायचं आहे की, काल जेव्हा आम्ही तिला दफन करण्यासाठी नेत होतो तेव्हा ती जिवंत होती. असं कसं झालं. आमच्याकडे व्हिडीओ आहे ज्यात ती शवपेटीला आतून धक्का देत आहे'.
रोजाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, अपघातानंतर रोजा कोमात गेली असेल. हेच कारण असेल की, डॉक्टरांनी विचार केला की, रोजाचं निधन झालं. पेरूमध्ये पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 
 

Web Title: Dead woman knocked the coffin from inside the people present in the condolence meeting were in fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.