काय सांगता! म्हशीच्या तेरवीला आलं होतं सारं गाव, पंगतीत लोकांनी जेवणावर मारला ताव...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 09:11 AM2021-01-09T09:11:16+5:302021-01-09T09:17:11+5:30

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शाकिस्त गावात राहणारे सुभाष व्यवसायाने शेतकरी आहेत आणि त्यांनी गेल्या ३२ वर्षांपासून एकच म्हैस पाळली होती.

Death buffalo village thirteen food pray Meerut Uttar Pradesh | काय सांगता! म्हशीच्या तेरवीला आलं होतं सारं गाव, पंगतीत लोकांनी जेवणावर मारला ताव...

काय सांगता! म्हशीच्या तेरवीला आलं होतं सारं गाव, पंगतीत लोकांनी जेवणावर मारला ताव...

Next

(Image Credit : aajtak.in)

उत्तर प्रदेशातील मेरठमधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात म्हशीची तेरवी आयोजित केल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर या तेरवीला संपूर्ण गावाला जेवण देण्यात आलं आणि पूर्ण रितीरिवाजाप्रमाणे लोकांनी म्हशीला श्रद्धांजली सुद्धा वाहिली. या अनोख्या तेरवीचा सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शाकिस्त गावात राहणारे सुभाष व्यवसायाने शेतकरी आहेत आणि त्यांनी गेल्या ३२ वर्षांपासून एकच म्हैस पाळली होती. या म्हशीने काही वर्षांपूर्वीच दूध देणं बंद केलं होतं. सुभाषने बालपणापासून ही म्हैस पाळली होती. त्यामुळे या म्हशीसोबत त्यांचा खास जिव्हाळा होता. याचकारणाने त्यांनी ही म्हैस कधीच विकली नाही. म्हशीच्या उपचारावरही सुभाषने खूप पैसे खर्च केले होते. पण तरी ते या म्हशीला वाचवू शकले नाहीत.

म्हशीच्या मृत्यूनंतर सुभाषच्या परिवाराने ढोल-नगाडे वाजवत या म्हशीची अंतिम यात्रा काढली होती. सोबत तिच्या तेरवीसाठी मंडप लावण्यात आला, हलवाईला बोलवण्यात आलं आणि पूर्ण गावातील लोकांना तेरवीचा प्रसाद देण्यात आला. यावेळी म्हशीसाठी श्रद्धांजली सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात लोकांनी फोटोवर फूल वाहून म्हशीच्या आत्म्याला शांती मिळण्याची प्रार्थना केली.

यावेळी शेतकरी सुभाष म्हणाले की, ते या म्हशीला आपल्या परिवारातील एक सदस्य मानत होते. त्यामुळे त्यांनी म्हैस मेल्यावर तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी कर्मकांड केले. इतकेच नाही तर लोकांनी येऊन तिच्यासाठी प्रार्थनाही केली. या अनोख्या घटनेने लोकांना आश्चर्य तर वाटतच आहे. पण सोबतच ते सुभाष यांचं म्हशीवरील प्रेम पाहून भारावूनही गेले आहेत.
 

Web Title: Death buffalo village thirteen food pray Meerut Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.