अंत्यसंस्कारावेळी रडु लागलं मृत बाळं, घडलेला प्रकार समजताच तुम्हालाही बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 04:49 PM2022-05-25T16:49:26+5:302022-05-25T16:52:09+5:30

एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणा योगायोग म्हणा की आणखी काही. रुग्णालयाने ज्या बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू झाल्याचं म्हटलं ते बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत झालं. दफन करताना ते अचानक रडू लागलं.

Declared dead by hospital, newborn baby found alive before burial in J&K’s Ramban | अंत्यसंस्कारावेळी रडु लागलं मृत बाळं, घडलेला प्रकार समजताच तुम्हालाही बसेल धक्का!

अंत्यसंस्कारावेळी रडु लागलं मृत बाळं, घडलेला प्रकार समजताच तुम्हालाही बसेल धक्का!

Next

अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की जगात चमत्कार नावाची काही गोष्ट नसते. लोक याला अंधश्रद्धा समजतात, तर काही लोग त्याला योगायोग असं नाव देतात. आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणा योगायोग म्हणा की आणखी काही. रुग्णालयाने ज्या बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू झाल्याचं म्हटलं ते बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत झालं. दफन करताना ते अचानक रडू लागलं (Dead Baby Gets Alive During Burial).

जम्मू-काश्मीरच्या बनिहालमधील ही घटना आहे.  बनिहाल उपआरोग्य केंद्रात शमीमा बेगम नावाची महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. सोमवारी तिने एका मुलीला जन्म दिला. पण बाळाची तपासणी केल्यानंतर रुग्णालयाच्या स्टाफने तिला मृत घोषित केलं. बाळाच्या आईच्या गर्भातच मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केला.  बाळाच्या आगमनाचा आनंद काही क्षणातच दुःखात बदलला. बाळ मृत म्हटल्यावर सर्वांनी आशाच सोडली होती. बाळाच्या स्वागताऐवजी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ ओढावली.

बाळाला घेऊन त्याचं कुटुंब होलन गावातील दफनभूमीत पोहोचलं. बाळाला दफन करण्यासाठी कबर बनवली जात होती. बाळाला दफन करणार तोच बाळ अचानक मोठमोठ्याने रडू लागलं. तिथं उपस्थित सर्वांना शॉक बसला. कारण ज्या बाळाला मृत घोषित करण्यात आलं ते जिवंत होतं. बाळ जर रडलं नसतं तर कदाचित त्याच्या पालकांनी त्याला कधीच जिवंत पाहिलं नसतं.

आता याला चमत्कार म्हणावा की वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा, ज्यांनी बाळाला मृत घोषित केलं आणि ते बाळ दफन करतानाच रडू लागलं. यानंतर दफनभूमीतच रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आलं.

Web Title: Declared dead by hospital, newborn baby found alive before burial in J&K’s Ramban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.