ब्रेन सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती मॉडल, तरी बेडवरून बनवत होती अॅडल्ट कंटेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:30 PM2022-03-21T18:30:48+5:302022-03-21T18:37:16+5:30
Adult Content Creator : महिलेला मेंदूच्या एका गंभीर सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण ती तिथेही अॅडल्ट कंटेंट बनवू लागली होती.
(Image Credit : @RubyMayTweets)
अॅडल्ट कंटेंट (Adult Content Creator) तयार करणाऱ्या लोकांना समाजाकडून वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. पण त्यांचं काम काही सोपं नसतं. अनेकदा या लोकांचं वेदनादायी काम समोर आलेलं आहे. पैसे कमावण्यासाठी त्यांना सतत फॅन्ससोबत कनेक्ट रहावं लागतं आणि फोटोज-व्हिडीओज सतत शेअर करावे लागतात. मग त्यांची तब्येत ठीक असो ना नसो. असंच काहीसं एका अॅडल्ट इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मॉडलने केलं आहे. महिलेला मेंदूच्या एका गंभीर सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण ती तिथेही अॅडल्ट कंटेंट बनवू लागली होती.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, २५ वर्षीय रूबी मे ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहते आणि फॅन्स ओन्ली साइटवर अॅडल्ट कंटेंट क्रिएटर आहे. काही दिवसांपूर्वी तिला अचानक चक्कर येऊ लागल्या होत्या आणि १० सेकंदासाठी डोकं भयंकर दुखत होतं. हा त्रास जास्त वाढला तेव्हा ती चेकअपसाठी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिला सांगितलं की तिला चियारी मॉलफॉर्मेशन आहे. ही एक कडींशन असते ज्यात मनुष्याच्या कवटीचा एक भाग योग्यप्रकारे विकसित होत नाही आणि त्यामुळे स्पाइनल कॉर्डवर प्रेशर पडतं.
रूबीला ४ मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि गंभीर सर्जरीमुळे तिला हॉस्पिटलमध्ये पाच दिवस ठेवण्यात आलं होतं. तिचं ऑपरेशन तीन तास चाललं आणि रिकव्हर होत असताना तिने फॅन्ससाठी कंटेंट तयार करणं बंद केलं नाही. तिने सांगितलं की, सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी तिने ओन्लीफॅन्ससाठी फोटो काढणं सुरू केलं होतं. ती म्हणाली की, ओन्लीफॅन्स ही साइट तिच्यासाठी जीवन जगण्याचं साधन आहे आणि ती कंटेंट बनवणं थांबवू शकत नाही. कारण तिला त्यांच्याकडून पैसे मिळत आहेत.
रिपोर्टनुसार, रूबीच्या ऑपरेशनला १५ लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च आला आणि हे सगळे पैसे तिने ओन्लीफॅन्सच्या कमाईच्या माध्यमातूनच दिले आहेत. सोशल मीडियावर तिने सर्जरीसंबंध फोटो शेअरकेले आहेत. ती म्हणाली की, ती स्वत:ला इतकी लकी मानते कारण ती एमआरआय स्कॅनसाठी गेली. तेव्हा तिला समजलं की जर तिने सर्जरी केली नसती तर ती पॅरलाइजही झाली असती किंवा तिला ब्रेन कॅन्सर झाला असता.