ड्रायव्हरने एक्स-गर्लफ्रेंडच्या आठवणीत सजवला ऑटो, अपूर्ण लव्हस्टोरी ऐकून इमोशनल व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 04:37 PM2024-06-18T16:37:38+5:302024-06-18T16:38:48+5:30

Viral Video : अनुपमा नावाच्या एका इन्स्टा यूजरने एक व्हिडीओ शेअर केलाय. ती एका ऑटोमध्ये बसली आहे आणि ऑटोवाला तिला त्याची पूर्ण न झालेली लव्हस्टोरी सांगत आहे.

Delhi auto driver decorated auto in memory of his lost love woman shares emotional video | ड्रायव्हरने एक्स-गर्लफ्रेंडच्या आठवणीत सजवला ऑटो, अपूर्ण लव्हस्टोरी ऐकून इमोशनल व्हाल!

ड्रायव्हरने एक्स-गर्लफ्रेंडच्या आठवणीत सजवला ऑटो, अपूर्ण लव्हस्टोरी ऐकून इमोशनल व्हाल!

Viral Video :  प्रेम ही जगातील सगळ्याच भारी वाटणारी बाब असते. असं प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माहीत असेलच. पण कधी कुणाला प्रेम मिळतं तर कुणाची प्रेम कहाणी अधुरी राहते. सध्या दिल्लीतील एका ऑटोवाल्याची लव्हस्टोरी चांगलीच व्हायरल झाली आहे. अनुपमा नावाच्या एका इन्स्टा यूजरने एक व्हिडीओ शेअर केलाय. ती एका ऑटोमध्ये बसली आहे आणि ऑटोवाला तिला त्याची पूर्ण न झालेली लव्हस्टोरी सांगत आहे.

अनुपमाने ऑटोवाल्यासोबतच्या संवादाची एक क्लीप शेअर केली आहेत. व्हिडीओ अनुपमाने ऑटोच्या सजावटीबाबत आणि लायटिंगबाबत ड्रायव्हरला विचारलं. तेव्हा त्याने त्याची लव्हस्टोरी सांगितली. ऑटोच्या मागच्या बाजूला 'A S' लिहिलेलं आहे. 

"मॅन इन लव्ह" असं कॅप्शन असलेल्या व्हिडीओत लिहिलं आहे की, 'मी चांगली लायटिंग आणि सजावट यासाठी ऑटोवाल्याचं अभिनंदन केलं. असं त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आठवणीत केलं. तो कामाच्या शोधात दिल्लीला आला होता. त्याच्या दोन दिवसांनीच त्याच्या प्रेयसीने दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न केल'.

सोशल मीडियावल लाखो लोकांनी ही पोस्ट लाइक केली आणि लोक या पोस्टवर कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, हे तर तमाशा सिनेमातील एका सीनसारखं वाटत आहे. दुसऱ्याने लिहिलं की, जेव्हा मी हौज खासमध्ये राहत होतो तेव्हा या ऑटोच्या वरच्या भागाचा फोटो काढला होता. तिसऱ्याने लिहिलं की, मला वाटतं मी या ऑटोमध्ये बसलो आहे. 

Web Title: Delhi auto driver decorated auto in memory of his lost love woman shares emotional video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.