खतरनाक! दिल्लीतील महिलेनं घटस्फोट न घेता 7 पुरूषांसोबत केलं लग्न, तिचा कारनामा वाचून उडेल झोप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:48 IST2025-04-02T12:46:04+5:302025-04-02T12:48:51+5:30
Looteri Dulhan : इतकंच नाही तर लग्न केलेल्या पुरूषांकडून पैसे लुटून ती फरार सुद्धा झाली आहे. चला जाणून घेऊ महिलेनं केलेल्या या खतरनाक कारनाम्याबाबत...

खतरनाक! दिल्लीतील महिलेनं घटस्फोट न घेता 7 पुरूषांसोबत केलं लग्न, तिचा कारनामा वाचून उडेल झोप...
Looteri Dulhan : एकापेक्षा जास्त बायका असलेल्या पुरूषांच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. कधी हे त्यांच्या परिवारांना माहीत असतं तर कधी लपूनच एकापेक्षा जास्त लग्न केली जातात. मात्र, एका महिलेचे एकापेक्षा जास्त म्हणजे तब्बल 7 पती असणं हे जरा जास्त झालं, नाही का? दिल्लीतील एका महिलेनं हा कारनामा केला असून सध्या तिची चर्चा रंगली आहे. या महिलेनं आधीच्या नवऱ्यांसोबत घटस्फोट न घेता एकापाठी एक 7 जणांसोबत लग्न केलं. इतकंच नाही तर लग्न केलेल्या पुरूषांकडून पैसे लुटून ती फरार सुद्धा झाली आहे. चला जाणून घेऊ महिलेनं केलेल्या या खतरनाक कारनाम्याबाबत...
न्यूज 18 हिंदीनं याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. त्यांच्या रिपोर्ट नुसार, महिलेच्या सातव्या पतीनं सांगितलं की, त्याच्या पत्नीचं नाव ज्योति उर्फ किट्टू आहे. 15 दिवसांआधीच त्याला त्याच्या पत्नीच्या या कारनाम्याबाबत माहिती मिळाली. पत्नीनं आधीही अनेकांसोबत लग्न केल्याचं त्याला समजलं आणि हे सगळे लोक दिल्लीतील राहणारे आहेत. त्यानं सांगितलं की, महिला आधी तरूणांच्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होती आणि नंतर त्यांना धमकी देऊन जबरदस्ती त्यांच्यासोबत लग्न करत होती. पुढे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे लुटत होती. (हे पण वाचा : आधी पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं, चार दिवसांनी तिला परत घेऊन आला, कारण...)
महिलेचा कारनामा...
महिलेचा सातवा पती सूरज यांनी सांगितलं की, ज्योति नांगलोई इथे राहणारी आहे आणि त्यांची भेट परिसरातील एका धार्मिक कार्यक्रमात झाली होती. बोलणं-चालणं वाढल्यावर दोघे प्रेमात पडले आणि नंतर ज्योति गर्भवती झाली. त्यानंतर तिनं सूरजवर लग्नासाठी दबाव टाकला. लग्नानंतर ते सोबत राहत होते. ज्योतिचे आई-वडिलही जवळच राहत होते. सूरज म्हणाला की, काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. पण काही महिन्यांनी त्याला त्रास देणं सुरू झालं. ज्योतिचे आई-वडिलही येऊन धमक्या देत होते. असं करत करत 1 वर्ष निघालं. त्यानंतर पत्नी त्याच्याकडून अडीच लाख रूपये घेऊन फरार झाली.
अजूनही फरार...
सूरजनं सांगितलं की, ज्योति अजूनही फरार आहे. ज्योतिवर केस चालू आहे. हायकोर्टाकडून तिचं बेलही रिजेक्ट करण्यात आली आहे आणि पोलीस तिच्या शोधात आहेत. पोलिसांनी जेव्हा ज्योतिच्या आई-वडिलांची चौकशी केली तेव्हा त्यांनी कागदपत्र दाखवत सांगितलं की, त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींनी संपत्तीतून बेदखल केलं आहे. त्यांच्या त्यांच्या मुलींशी काहीही संबंध नाही.