कस्टमरच्या घराबाहेर डिलिव्हरी बॉयने केलं किळसवाणं कृत्य, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:25 PM2022-03-23T17:25:08+5:302022-03-23T17:30:02+5:30
डिलीव्हरी बॉय आपलं फूड पार्सल घेऊन येतात. पण हे डिलीव्हरी बॉय काय करतील याचा नेम नाही. याआधी डिलीव्हरी बॉयचे बरेच प्रताप समोर आले आहेत. आता असाच एक डिलीव्हरी बॉय चर्चेत आला आहे.
भूक लागली आणि घरी कुणी काही बनवून देणारं नसेल, आपल्यालाही घरात काही बनवायचा किंवा बाहेर जाऊनही काही खाण्याचा कंटाळा आला असेल तर आपण पटकन ऑनलाईन फूड ऑर्डर करतो. काही मिनिटांतच आपल्याला जे खायला हवं ते घरपोच मिळतं. डिलीव्हरी बॉय आपलं फूड पार्सल घेऊन येतात. पण हे डिलीव्हरी बॉय काय करतील याचा नेम नाही. याआधी डिलीव्हरी बॉयचे बरेच प्रताप समोर आले आहेत. आता असाच एक डिलीव्हरी बॉय चर्चेत आला आहे.
इंग्लंडच्या लिसेस्टरमधील (Leicester, England) डिलीव्हरी बॉयने एक कांड केला आहे. त्याने ग्राहकाच्या घराजवळ पोहोचताच त्याच्याच घराच्या दरवाजाबाहेर असं काही केलं की पाहून ग्राहकालाही धक्का बसला. या ग्राहकाच्या दरवाजाजवळ कॅमेरा होता, या कॅमेऱ्यात या डिलीव्हरी बॉयचं संतापजनक कृत्य कैद झालं आणि ग्राहकाच्या रागाचा पारा चढला.
डिलीव्हरी बॉय दरवाजाजवळ आला त्याने डोअरबेल वाजवली. ग्राहक दरवाजा उघडणार त्याआधी डिलीव्हरी बॉयने संधी साधली. घरातील व्यक्ती हा बॉय काय करतो आहे हे सर्व कॅमेऱ्यात पाहत होती. त्याची पत्नी जेव्हा ऑर्डर रिसीव्ह करायला गेली तेव्हा डोअरबेल कॅमेऱ्यात तिला जे दिसलं ते पाहूनच ती शॉक झाली. इंटरकॉमवर तिने त्याला सुनावलं तसं तो लगेच थांबला. स्टोरीफूलच्या रिपोर्टनुसार ग्राहक दरवाजा उघडण्यापूर्वी बॉयने एका फूड पाकिटाला आपलं तोंड लावून उष्टावलं. आपल्या तोंडाने ते पाकिट खोललं आणि त्यातील पदार्थांची चव त्याने चाखली.
डिलीव्हरी बॉयजने ग्राहकांचे पदार्थ खाण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. यूएस फूड्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५०० पैकी २८ टक्के डिलीव्हरी बॉयजनी आपण कधीकधी फूड डिलीव्हरी ग्राहकांचे पदार्थ थोडे किंवा संपूर्ण फस्त केल्याचं कबूल केलं आहे. याचं कारण विचारता ५४ टक्के बॉयजनी पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या सुगंधामुळे ते स्वतःला रोखू शकत नाही असं म्हटलं आहे.