मुलगी दूध खरेदी करण्यासाठी गेली अन् बनली करोडपती; लागली 2.8 कोटींची लॉटरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:33 PM2022-11-14T13:33:32+5:302022-11-14T13:34:02+5:30
कॅरेन पार्किन असे या मुलीचे नाव असून ती इंग्लंडमधील नॉटिंगहॅमची रहिवासी आहे.
छोट्या गरजांसाठी कधीही पैसे नसलेल्या एका मुलीला अचानक 2.8 कोटी रुपये मिळाले. ही मुलगी डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करायची आणि तिच्याकडे गाडीत पेट्रोल भरण्यासाठीही पैसे नव्हते. नंतर तब्येतीच्या कारणामुळे तिला नोकरी सोडावी लागली. मात्र, नंतर तिचे नशीब असे चमकले की, ती एका रात्रीत करोडपती बनली.
कॅरेन पार्किन असे या मुलीचे नाव असून ती इंग्लंडमधील नॉटिंगहॅमची रहिवासी आहे. पार्किनने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी ती ब्रेड आणि दूध घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेली होती. येथे तिने पाहिले की, एका मुलीला 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ते पाहून पार्किनलाही लॉटरी काढण्याची इच्छा झाली. यानंतर तिने लॉटरीत अनेकदा नशीब आजमावले. पण, यश मिळाले नाही. मात्र, गेल्या महिन्यात पार्किनची लॉटरी लागली, तीही 2 कोटी 83 लाख रुपयांची.
द सनच्या वृत्तानुसार, कॅरेन पार्किनचे म्हणणे आहे की, तिने एका दुकानातून राष्ट्रीय लॉटरीची दोन तिकिटे खरेदी केली. पहिले तिकीट स्क्रॅच करताच तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या लॉटरी तिकिटाचा नंबर लागला होता. दुसऱ्या तिकिटाचा नंबर थोडा अस्पष्ट होता म्हणून तिने तो पाहिला नाही. तिने काही मित्रांना तिचा लकी नंबर तपासण्यासाठी तिकीटही दाखवले आणि जेव्हा ती लॉटरी जिंकल्याचे कन्फर्म झाले. यावेळी पार्कीनचा आनंद गगनात मावेनासा झाला.
दुसऱ्या दिवशी लॉटरी ऑफिसमधून फायनल कॉल आला की, ती विजेती झाली आहे. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. तिला अजूनही विश्वास बसत नाही की ती खरोखरच करोडपती झाली आहे. कारण, मला आयुष्यात सर्वत्र निराशाच आली आहे, असे पार्किनने सांगितले. तसेच, सध्या पैसे मिळाल्यानंतर पार्कीन कुटुंबासह परदेशात जाण्याचा विचार करत आहे.