झोपेच्या ६० गोळ्या खाऊन ‘त्याने’ दिली अखेरच्या जेवणाची ऑर्डर, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:57 PM2022-01-20T23:57:24+5:302022-01-20T23:58:21+5:30
संबंधित व्यक्ती आर्थिक गुंतवणुकीत झालेल्या नुकसानीमुळे खूप चिंताग्रस्त होता.
बीजिंग – गुंतवणुकीत लाखो रुपये बुडाल्यानंतर एका व्यक्तीने नशेच्या गोळ्या खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्युपूर्वी अखेरचं जेवण करण्यासाठी त्याने फूड डिलीवरीवर जात ऑनलाइन ऑर्डर दिली त्यानंतर एक चमत्कार घडला. सध्या ही घटना सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. चीनच्या हेनान प्रांतातील व्यक्तीनं लाखोंची गुंतवणूक केली होती परंतु त्याचे सर्व पैसे बुडाले.
इतकं मोठं आर्थिक नुकसान झाल्याने त्याच्या मानसिक दडपण आलं. त्याने झोपेसाठी ६० गोळ्या खाल्ल्या आणि फूड डिलीवरी मागवली. माझ्या आयुष्यातील ही अखेरची ऑर्डर आहे असं सांगत त्याने फोन कट केला. त्यानंतर या प्रकरणी संशय आल्यानं डिलीवरी बॉयनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्याचसोबत त्या व्यक्तीचा नंबर आणि पत्ताही सांगितला. ज्याठिकाणाहून कॉल आला होता तिथं पोलीस आणि फायर बिग्रेडची टीम घटनास्थळी पोहचली.
पोलीस आल्याचं कळताच त्या व्यक्तीने दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यानंतर खिडकीतून बाहेर उडी मारण्याची धमकी दिली. परंतु पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकण्यास तयार नव्हता. तेव्हा अचानक एका अग्निशमन दलाच्या जवानानं त्याच्या खोलीत प्रवेश केला आणि त्याचा जीव वाचवला. वेळीच पोलिसांना माहिती दिल्यानं डिलीवरी बॉयचं पोलिसांनी कौतुक केले. या घटनेबाबत पोलीस म्हणाले की, संबंधित व्यक्ती आर्थिक गुंतवणुकीत झालेल्या नुकसानीमुळे खूप चिंताग्रस्त होता. त्याने मोठ्या मेहनतीनं कमावलेली आई वडिलांची संपत्ती पणाला लावली होती त्याचं त्याला दु:खं झालं होतं. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा तो खूप रडत होता. या जगात राहायचं नाही असं म्हणत होता. परंतु डिलीवरी बॉयनं वेळीच घटनेची माहिती दिल्यानं त्या व्यक्तीचा जीव वाचवता आलं असं पोलीस म्हणाले.