Vim साबणाने दात स्वच्छ करत होती ही व्यक्ती, तोंडाची स्थिती पाहून डेंटिस्ट हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 02:54 PM2021-09-10T14:54:46+5:302021-09-10T14:57:30+5:30
एका व्यक्तीने चमकदार मिळवण्यासाठी असं काही केलं की, डेटिंस्टही हैराण झाला. पण या व्यक्तीला असं करणं चांगलंच महागात पडलं.
कुणालाही हेच वाटत असतं की, त्यांच्या दातांची चमक मोत्यांसारखी असावी. दाच चमकदार असेल तर लोकांवर चांगलं इम्प्रेशन पडतं. जर दात घाणेरडे किंवा पिवळे असतील तर तुमच्या पर्सनॅलिटीवरही पाणी फेरलं जातं. हेच कारण आहे की, चमकदार दात मिळवण्यासाठी लोक नको नको ते करतात. एका व्यक्तीने चमकदार मिळवण्यासाठी असं काही केलं की, डेटिंस्टही हैराण झाला. पण या व्यक्तीला असं करणं चांगलंच महागात पडलं. चमकदार दात मिळवण्यासाठी त्याच्या तोंडात फोड आले.
चमकदार दात पर्सनॅलिटीमध्ये चार चांद लावतात. दातांची काळजी शरीराच्या इतरा अवयवांप्रमाणे गरजेची असते. मॅनचेस्टरच्या ७४ वर्षीय डेटिंस्ट डॉक्टर बर्नार्ड लेस्टरने आपल्या नव्या पुस्तकात एका असा क्लाएंटचा उल्लेख केला, ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. (हे पण वाचा : बाबो! कपाळावर १७४ कोटी रूपयांचा हिरा लावून फिरत होता रॅपर, गर्दीत फॅनने लांबवला)
डॉक्टर बर्नार्ड यांच्यानुसार, एकदा क्लीनिकमध्ये आलेल्या एका क्लाएंटचे दात बघून तो हैराण झाला. त्याचे दात फारच चमकदार होते. सामान्यपणे असं कमी होतं. टेस्ट दरम्यान जेव्हा डॉक्टरांनी त्याचं तोंड उघडलं तर डॉक्टर आणखी हैराण झाले. क्लाएंटच्या तोंडात फोड झाले होते. डॉक्टरांनी जेव्हा याचं कारण विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, तो विम बारने त्याचे दात स्वच्छ करत होता.
डॉक्टर बर्नार्डने आपल्या पुस्तकातून लिहिलं की, त्याच्या जीवनात त्यांनी इतकी अजब केस नाही पाहिली. डॉक्टरने लिहिलं की, या व्यक्तीने विम बारने दात स्वच्छ करून गम्स खराब केले होते.. त्याच्या पूर्ण तोडांत फोड झाले होते. त्यामुळे त्याच्या सर्जरी करण्याची वेळ आली होती. डॉक्टरांनुसार, जेव्हा त्यांनी विचारलं की, तुम्ही कोणता टूथपेस्ट वापरता. तर त्याने सांगितलं होतं की, तो कपडे धुण्याचा विम बारने दात स्वच्छ करतो. हे ऐकताच डॉक्टर हैराण झाले होते.