Desi Jugaad : उकाड्यापासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड, पाण्याच्या टाकीपासून बनवला देशी एसी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:22 PM2022-03-08T14:22:02+5:302022-03-08T14:23:12+5:30
Desi Jugaad : कित्येकदा तर महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोकं देसी जुगाडचा वापर करतात. गाव असो की शहर, प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वतःचे फायदे आहेत.
देसी जुगाड (Desi Jugad) भारतात खूप प्रसिद्ध आहे. देशात अशी कोणतीही समस्या नसेल ज्यासाठी लोकांनी कोणता ना कोणता जुगाड केला नसेल. या जुगाडमुळे अनेक समस्यांवर अगदी काही वेळात समाधान शोधले जाते. कित्येकदा तर महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोकं देसी जुगाडचा वापर करतात. गाव असो की शहर, प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वतःचे फायदे आहेत. त्यामुळे काही श्रीमंत आहेत तर काही गरीब आहेत, पण ते त्यांच्या आयुष्यात कधीतरी जुगाड नक्कीच वापरतात. सोशल मीडियावर देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अशाच काही जुगाडांबद्दल जाणून घेऊया... जुगाड ही नवीन शोधाची सुरुवात आहे. उत्तर भारतात थंडी हळुहळू संपत असल्याने लोकांनी आता घरातील पंखे सुरू केले आहेत. काहींना खूप गरम वाटतं, त्यामुळे या मोसमातही ते एसीची हवा खाऊ लागतात. मात्र, उन्हाळा येण्यापूर्वीच काही जण स्वत:साठी काही जुगाड करायला लागतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच पाण्याच्या टाकीतून 'देशी एसी' तयार करण्यात आला होता.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्तीने पाण्याच्या साठवणुकीच्या टाकीवर कटिंग करून ते जवळपास कुलरसारखे बनवले आहे. एसीप्रमाणे डब्यातून हवा यावी, त्यासाठी त्या व्यक्तीने पाण्याच्या टाकीत गवत लावले. उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या घरी एसी तयार करून घेतला. सेटिंग पूर्णपणे कूलरप्रमाणे आहे, परंतु हवा एसीपेक्षा कमी होणार नाही. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. दरम्यान, इंस्टाग्रामवर desijugad7 नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे.