ब्रिटनमध्ये घरांच्या टंचाईवर असा शोधला उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:18 AM2017-10-16T01:18:18+5:302017-10-16T01:18:38+5:30
ब्रिटनमध्ये राहत्या घरांच्या वाढत्या टंचाईवर उपाय म्हणून मायक्रो-होमचा उपाय शोधण्यात आला आहे. १२ आॅक्टोबर रोजी या छोट्या घराच्या किल्ल्या किरॅन इव्हॅन्स (१८) या मुलाला दिल्या गेल्या. १८६ चौरस फुटांचे घर शर्यतीतील शिडाची नाव आणि उत्कृष्ट दर्जाच्या विमानाच्या केबिन्सपासून बनविलेले आहे.
ब्रिटनमध्ये राहत्या घरांच्या वाढत्या टंचाईवर उपाय म्हणून मायक्रो-होमचा उपाय शोधण्यात आला आहे. १२ आॅक्टोबर रोजी या छोट्या घराच्या किल्ल्या किरॅन इव्हॅन्स (१८) या मुलाला दिल्या गेल्या. १८६ चौरस फुटांचे घर शर्यतीतील शिडाची नाव आणि उत्कृष्ट दर्जाच्या विमानाच्या केबिन्सपासून बनविलेले आहे. वोर्सेस्टरमधील बारबोर्न येथे हे घर उभारण्यासाठी ४० हजार पौंड खर्च आला आहे. हा युवक वर्षभर यंग मेन्स ख्रिश्चन्स असोसिएशनच्या वसतिगृहात राहिला होता. आता तो स्वत:च्या घरात गेला आहे. जगात अशा प्रकारच्या घराचा हा पहिलाच प्रकल्प आहे, असे मानले जाते. देशातील राहत्या घरांच्या तीव्र टंचाईवर हा उपाय मानला जात आहे. जर हा प्रकल्प यशस्वी ठरला, तर सगळ््या ब्रिटनमध्ये अशी घरे तयार केली जातील. मला स्वत:चे घर मिळाल्याचा खूप आनंद होत आहे, असे किरॅन इवॉन्स म्हणाला.