'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:19 PM2020-08-30T13:19:26+5:302020-08-30T14:15:09+5:30
एरिक सोल्हेम यांनी एका पुलाचा फोटो ट्विट करून विकासासोबत निसर्गाचीही काळजी घेतली जाऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी दिल्ली : नॉर्वेचे राजदूत एरिक सोल्हेम यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवर एक टि्वट केले आहे. हे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या मनाला भिडले आहे. आनंद महिंद्रा यांना हे ट्विट इतके आवडले की त्यांनी ते रिट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक विनंतीही केली आहे.
एरिक सोल्हेम यांनी एका पुलाचा फोटो ट्विट करून विकासासोबत निसर्गाचीही काळजी घेतली जाऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच, निसर्गासोबतच विकास शक्य असल्याचे म्हटले आहे. एरिक सोल्हेम यांनी ट्विटमध्ये पोस्ट केलेला पूल नेदरलँड्समधील आहे. या पुलाला ईकॉडक्ट देखील म्हटले जाते. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ते रस्त्याच्या दुतर्फा जंगलाला एकमेकांशी जोडलेल्या आहेत. यामुळे जंगलातील प्राण्यांना आपला जीव धोक्यात न घालता पुलावरुन रस्ता ओलांडता येतो. हा पूल काँक्रीटचा नाही. पण, तो हिरवळीने व्यापलेला आहे.
काय म्हणाले आनंद महिंद्रा?
आनंद महिंद्रा यांनी या पुलाचा फोटो रिट्विट केला आहे. तसेच, विकास आणि निसर्गाचा एकत्र राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे लिहिले आहे. याशिवाय, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही त्यांनी विनंती केली आहे. भारतातही महामार्ग बांधताना याची काळजी घेतली जाऊ शकते का? जर नितीन गडकरी यांनी असे केले तर त्यांच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवीन, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
The perfect way to coexist. @nitin_gadkari ji if you can make this a standard feature when building highways through particular zones, we will give you a standing ovation! https://t.co/vEN0FeIcLN
— anand mahindra (@anandmahindra) August 29, 2020
दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला काही तासात नितीन गडकरी यांनी रिप्लाय दिला आहे. "आनंद महिंद्राजी आपल्या सल्ल्याबद्दल खूप आभारी आहे. अशा नवनिर्मितीची काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यावरणीय समतोल राखला पाहिजे," असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यासोबतच जंगलाच्या मध्यभागी महामार्ग बांधताना प्राण्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये, याची खबरदारी कशी घेतली जाते हे दर्शविताना नितीन गडकरी यांनी तीन फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये महामार्ग हे पुलासारखे बांधले आहेत. जेणेकरून पुलाखालून वन्य प्राणी सहजपणे इकडून तिकडे जाऊ शकतील.
The perfect way to coexist. @nitin_gadkari ji if you can make this a standard feature when building highways through particular zones, we will give you a standing ovation! https://t.co/vEN0FeIcLN
— anand mahindra (@anandmahindra) August 29, 2020
Thank you for your suggestion @anandmahindra ji. Yes, we need to look at similar innovations. Ecological balance has to be maintained. pic.twitter.com/S4X8OQvI1m
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 29, 2020
आणखी बातम्या...
काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...
धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं
- अॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर
- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा
- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार
- CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...
- आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार