संसदेत बसलेल्या गोरिल्लांच्या पेंटिंगला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, जाणून घ्या खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 12:23 PM2019-10-08T12:23:24+5:302019-10-08T12:28:39+5:30
पेंटरच्या एका माजी सहकाऱ्याने सांगितले की, ही पेंटिंग खरेदी करणाऱ्यांनी नक्कीच या पेंटिंगमध्ये काहीतरी अमूल्य असं पाहिलं असेल, म्हणूनच त्यांनी ही पेंटिंग खरेदी केली.
लंडनमधील एका अज्ञात व्यक्तीकडून काढण्यात आलेल्या दुर्मीळ पेंटिंगला रेकॉर्ड ब्रेक किंमत मिळाली आहे. ही पेंटिंग ब्रिटीश संसद 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये बसलेल्या गोरिल्लाची आहे. ही पेंटिंग २००९ मध्ये तयार करण्यात आली. सुरूवातीला या पेंटिंगची किंमत १३ ते २० कोटी रूपये येईल असा अंदाज होता. पण लिलावात या पेंटिंगला ८६.४१ कोटी रूपये किंमत मिळाली.
या पेंटिंगला 'डिवॉल्व्ड पार्लियामेंट' असं टायटल देण्यात आलं. लिलावात ही पेंटिंग खरेदी करण्यासाठी एकूण १० लोकांनी बोली लावली होती. मीडियात रिपोर्ट्सनुसार, १३ फूट लांब ही पेंटिंग केवळ १३ मिनिटांमध्येच विकली गेली.
(Image Credit : nytimes.com)
ब्रिटीश संसदेत बसलेल्या गोरिल्लांची पेंटिंग करणाऱ्या पेंटरने सुरूवातीला या पेंटिंगचं नाव 'क्वश्चन टाइम' असं ठेवलं होतं. पण याचवर्षी मार्च महिन्यात ब्रिस्टल म्युझिअममध्ये या पेंटिंगच्या प्रदर्शनापूर्वीच या नाव बदलण्यात आलं. या पेंटिंगचा फोटो बॅक्सी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.
पेंटरच्या एका माजी सहकाऱ्याने सांगितले की, ही पेंटिंग खरेदी करणाऱ्यांनी नक्कीच या पेंटिंगमध्ये काहीतरी अमूल्य असं पाहिलं असेल, म्हणूनच त्यांनी ही पेंटिंग खरेदी केली.