‘या’ गावात माणसं असूनही असते भयाण शांतता; भारतीय लष्करानं घेतलंय दत्तक, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:04 AM2022-03-24T11:04:00+5:302022-03-24T11:10:42+5:30
गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही.
भारतात बरीच गावं अशी आहेत ज्यांच्या वैशिष्ट्यामुळे ती प्रसिद्ध आहेत. जम्मूमधील एक गाव असे आहे. ज्याठिकाणी हजारोंची लोकसंख्या आहे परंतु या गावातील निम्मी लोकसंख्या ना बोलू शकते ना त्यांना काही ऐकायला येते. या गावातील बहुतांश लहान मुले मुक-बधीर आहेत.गावातील प्रत्येक कुटुंबाची ही समस्या आहे. गावात निम्म्याहून अधिक लोकांना बोलता येत नाही. काहींच्या मते, गावाला हा शाप असल्याचं बोललं जाते. जाणून घ्या नेमकं या गावची काय स्थिती आहे? या गावात असे का होते? ज्यामुळे याठिकाणी जन्मलेली मुलं मूक बधीर होतात
जम्मूतील हे गाव आहे ज्याठिकाणी गावातील अर्धी लोकसंख्या बोलणे आणि ऐकणे असक्षम आहे. या गावाचं नाव डडकई असं आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रवाहपासून १०५ किमी. अंतरावर एका पर्वतावर हे गाव वसलेले आहे. डीडब्ल्यू रिपोर्टनुसार, या गावात १०५ कुटुंब राहतात त्यातील ७८ हून अधिक लोकांना काही ऐकायला आणि बोलायला येत नाही. त्यामुळे आता हे गाव सन्नाटा गाव म्हणून ओळखलं जाते. या गावातील अनेक कुटुंबात जन्मलेली मुलं मूक-बधीर आहेत.
गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही. ज्या कुटुंबात मूक बधीर असतील तिथे लग्न करण्याची शक्यता कमी आहे. कारण अनुवांशिक आजार असल्याने तो मुलांमध्ये पसरत असल्याची समज लोकांमध्ये आहे. या गावात एक बधीर मुलगा जन्माला आलेलं पहिलं प्रकरण १९०१ मध्ये समोर आलं होते. १९९० मध्ये याठिकाणी ४६ बधीर लोकं होती. या गावात असलेल्या आजारामुळे भीतीपोटी काहीजण पंजाब आणि देशातील अन्य भागात वास्तव्यास गेली.
वैज्ञानिकांच्या मते, यामागे अनुवांशिक दोष आहे. हा आजार विविध समुदायातील विवाहामुळे जास्त पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोकं मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेत आहेत. याठिकाणचे लोकं आंतरजातीय विवाहही जास्त करतात. त्यामुळे ही समस्या असल्याचं बोललं जाते. परंतु गावातील काही कथित कहानी असल्याचं बोलतात आणि या आजाराला शाप असल्याचं सांगतात. या गावाला भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सनं दत्तक घेतले आहे. लष्कर याठिकाणी कपडे, खाद्य आणि आरोग्य सुविधा यासारख्या गोष्टी गावातील घरोघरी जाऊन पुरवत असतात