भांडणाला कंटाळून पळून गेलेला 'तो' अखेर कोरोनाच्या भीतीनं २० वर्षांनी परतला; पत्नी म्हणाली......
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 07:38 PM2020-08-12T19:38:42+5:302020-08-12T19:51:14+5:30
कौटुंबिक कलहांमुळे पळून गेलेला एक माणूस तब्बल २० वर्षांनी आपल्या घरी परत आला आहे. या माहामारीने कुटुंबापासून दूर असलेल्या या व्यक्तीची कुटुंबाशी भेट घडवली आहे.
कोरोनाच्या माहामारीनं व्यापक रूप घेतलेलं आहे. अचानकपणे आलेली ही माहामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल घडून आला आहे. कोरोनाकाळात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी काही ठिकाणी सकारात्मक घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या माहामारीत कौटुंबिक कलहांमुळे पळून गेलेला एक माणूस तब्बल २० वर्षांनी आपल्या घरी परत आला आहे. या माहामारीने कुटुंबापासून दूर असलेल्या या व्यक्तीची कुटुंबाशी भेट घडवली आहे.
सन २००० मध्ये धनबादच्या झरियामध्ये ही घटना घडली होती. लिलोरी पथरा या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सत्य नारायण यादव यांचे वय ५५ वर्ष आहे. कुटुंबात वाद झाल्यामुळे हा व्यक्ती घर सोडून पळून गेला होता. त्यानंतर आसपासच्या गावात भाड्यानं घर घेऊन हा माणूस एकटाच राहत होता. बेपत्ता झाल्यानंतर या व्यक्तीच्या पत्नीचे पोलिसात तक्रारही दाखल केली होती. पण प्रयत्न करूनही या व्यक्तीचा काही पत्ता लागत नव्हता.
घरातून पळून गेल्यानंतर सत्य नारायण यादव हे वजन मोजण्याचं मशीन घेऊन लोकांचे वजन मोजण्याच काम करत होते. पण मागील आठवड्यात त्यांची प्रकृती बरी नव्हती. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसून येत होती. म्हणून ते बाहेर न जाता काही दिवस घरीच होते. कोरोनाच्या माहामाहारीत अशी लक्षणं दिसून आल्यामुळे ग्रामीण लोकांना भय खूप सतावत होते. गावातील लोकांनी विचारणा केल्यास माझं कोणतीही नसून मी एकटा राहत असल्याचे या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर या व्यक्तीची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी धमकावून विचारल्यानंतर या व्यक्तीनं आपल्या कुटुंबाबद्दल माहिती दिली रडू लागला.
त्यांनी पोलिसांना सांगितले की, '' माझं नाव सत्य नारायण यादव नसून गजाध सोनार आहे. सन २००० मध्ये घरगुती भांडणामुळे मी घर सोडून निघून आलो. मी बेल गड झुमरी तलैया, कोडरमा जिल्ह्यातील रहिवासी आहे. १९८५ ते २००० पर्यंत मी इंटरप्राइजेज मेडिकलमध्ये काम केलं. दरम्यान कुटुंबात भांडणं झाल्यानं मी घर सोडून निघून आलो.''
पोलिसांनी सुचना दिल्यानंतर या सदर व्यक्तीची पत्नी अनीतादेवी आणि मुलगा चंदेश्वर हे पोलीस स्थानकात पोहोचले. अनेक वर्षानी पतीला पाहिल्यानंतर पत्नीला रडू कोसळले. पोलिसांना अनीतादेवी यांनी सांगितले की, ''पती बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. तसंच खूप ठिकाणी शोध घेतला. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. पण आता मी खूप खुश आहे.'' या शब्दात अनितादेवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .
हे पण वाचा :
बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!
अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं
कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं