Diamond Rain : या दोन ग्रहांवर सतत पडतो हिऱ्यांचा पाऊस, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:58 PM2022-07-06T16:58:41+5:302022-07-06T16:59:34+5:30

Diamond Rain : या दोन अजब ग्रहांचं नाव आहे नेप्टयून आणि यूरेनस. या दोन्ही ग्रहांवर चमत्कार होत आहे. या दोन्ही ग्रहांवर पाण्याचा नाही तर हिऱ्यांचा पाऊस पडतो. चला जाणून घेऊ हे असं का होतं.

Diamond rain on uranus and neptune in solar system know why | Diamond Rain : या दोन ग्रहांवर सतत पडतो हिऱ्यांचा पाऊस, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण...

Diamond Rain : या दोन ग्रहांवर सतत पडतो हिऱ्यांचा पाऊस, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण...

Next

Diamond Rain : पृथ्वीवर आणि आकाशात आजही अनेक रहस्य कायम आहेत. ज्यांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून वैज्ञानिक करत आहेत. अंतराळात अनेक ग्रह आहेत, त्यातील काही फारच अजब आहेत. दररोज त्यांच्याबाबत काहीना काही अजब ऐकायला मिळतं. आपल्या सौरमंडळात असेच दोन रहस्यमय ग्रह आहेत. पृथ्वीवर मॉन्सूनमुळे धो-धो पाऊस पडत आहे, तर या दोन ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडत आहे.

या दोन अजब ग्रहांचं नाव आहे नेप्टयून आणि यूरेनस. या दोन्ही ग्रहांवर चमत्कार होत आहे. या दोन्ही ग्रहांवर पाण्याचा नाही तर हिऱ्यांचा पाऊस पडतो. चला जाणून घेऊ हे असं का होतं.

पृथ्वीवर पाण्याची निर्मिती हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या थेंबामुळे होते. तर अनेक ग्रहांवर पाण्याचे थेंब जाड आणि जड असतात. यांची निर्मिती पाण्याऐवजी कार्बनने होते. या ग्रहांवर कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड तापमान आणि दबावाची स्थिती जास्त असल्याने तुटतो. याच कारणाने इथे हिऱ्यांचा पाऊस पडतो.

या ग्रहांवर अनेक वर्षांपासून हिऱ्यांचा पाऊस पडत आहे आणि ते ग्रहाच्या बर्फाळ भागावर जमा होत आहेत. वैज्ञानिकांचा दावा आहे की, या दोन्ही ग्रहांवरील वातावरणामुळे कार्बन परमाणुंना इतकं कठोर करू शकतो की, ज्यामुळे हिरे निर्माण होतात. 

वैज्ञानिक नाओमी रोवे-गर्नी म्हणाले की, नेप्टयून आणि यूरेनसवर हिऱ्यांचा पाऊस पडतो. पण असा विचार करू नका की, तिथे पृथ्वीसारखा पाऊस पडत असेल. ते म्हणाले की, कोणत्यागी ढगांमध्ये हिरे नसतात. पण ते एका वैज्ञानिक प्रक्रियेमुळे तयार होतात. 

नाओमी रोवे-गर्नी म्हणाले की, दोन्ही ग्रह मीथेन गॅसमुळे निळ्या रंगाचे दिसतात. आपणा सर्वांनाच माहीत आहे मीथेन कार्बन असतं. ते म्हणाले की,  नेप्टयून आणि यूरेनसवर हवेचा दाब जास्त आहे. त्यामुळे कार्बन अनेकदा वेगळा होतो. दबावामुळेच क्रिस्टलची निर्मिती होते जो एक हिरा असतो.

Web Title: Diamond rain on uranus and neptune in solar system know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.