या पार्कमध्ये सापडतात हिरे

By admin | Published: May 5, 2017 01:18 AM2017-05-05T01:18:11+5:302017-05-05T01:18:11+5:30

अमेरिकेच्या अरकान्सास स्टेटमध्ये एक असे पार्क आहे जिथे चक्क हिरे सापडतात. ३७ एकरमध्ये पसरलेल्या या पार्कमध्ये आतापर्यंत

The diamonds found in this park | या पार्कमध्ये सापडतात हिरे

या पार्कमध्ये सापडतात हिरे

Next

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अरकान्सास स्टेटमध्ये एक असे पार्क आहे जिथे चक्क हिरे सापडतात. ३७ एकरमध्ये पसरलेल्या या पार्कमध्ये आतापर्यंत अनेक हिरे सापडले आहेत. अनेक लोक येथे हिरे शोधताना दिसून येतील. ज्याला हिरा सापडतो तो त्याचाच होतो. या नॅशनल पार्कमध्ये जाण्यापूर्वी येथे फी भरावी लागते. येथे मिळणाऱ्या हिऱ्यावर सरकार कोणताही कर लावत नाही. असे सांगतात की, हे पार्क जॉन हडलेस्टोन यांच्या मालकीचे होता. त्यांना प्रथम या जमिनीत दोन हिरे सापडले होते. जॉन यांनी ही जमीन विकल्यानंतर ती १९७२ मध्ये नॅशनल पार्कमध्ये आली. काही वर्षांनंतर हा पार्क सर्वांसाठी खुला करण्यात आला. आतापर्यंत या ठिकाणी ३१ हजारपेक्षा अधिक हिरे सापडले आहेत.

Web Title: The diamonds found in this park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.