ना लॉकडाऊन ना टेस्टिंग तरीसुद्धा 'या' देशाने कोरोनाला हरवलं; जाणून घ्या कसं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 04:06 PM2020-05-26T16:06:26+5:302020-05-26T16:23:59+5:30
सलून, रेस्टॉरंट सर्वच या ठिकाणं खुले आहेत. तसंच रुग्णांवर आणि लोकांवर लक्ष देण्यासाठी कोणतंही एप्लिकेशन तयार करण्यात आलेलं नाही.
जपानमध्ये वेगाने कमी होत असलेल्या कोरोना विषाणूंच्या प्रभावामुळे आणीबाणी संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी जपानच्या नागरीकांवर कोणत्याही पद्धतीचे प्रतिबंध घालण्यात आलेले नाही. सलून, रेस्टॉरंट सर्वच या ठिकाणं खुले आहेत. तसंच लोकांवर आणि रुग्णांवर लक्ष देण्यासाठी कोणतंही अॅप तयार करण्यात आलेले नाही.
जपानमध्ये लोकांची टेस्ट करण्यावर सुद्धा जास्त भर दिलेला नाही. जपानने आपल्या लोकसंख्येच्या फक्त ०.२ टक्के लोकांची तपासणी केली आहे. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊन मृत्यू होत असलेल्यांची संख्या सुद्धा तिथे कमी आहे. आज आम्ही तुम्हाला जपानमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात असण्याची कारणं सांगणार आहोत.
वासेदा यूनिव्हरसिटीचे प्रोफेसर मिकहितो तनाका यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपान कोरोनाला व्हायरसला रोखण्यासाठी यशस्वी ठरला असला तरी संशोधकांना या मागच्या कारणांची कल्पना नाही. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मास्क वापरण्याची संस्कृती, लठ्ठपणाचा दर कमी असणं, शाळा लवकर बंद करणं यामुळे संक्रमण रोखता येऊ शकलं.
कॉटेक्ट ट्रेसिंग
जपानमध्ये जानेवारी महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर कॉटेक्ट ट्रेसर्सने आपलं काम सुरू केलं. जपानमधील सार्वजनिक स्थळी ५० हजारांपेक्षा जास्त नर्सेसची नियुक्ती करण्यात आली. ज्या नर्स इन्फेक्शन ट्रेस करण्याच्या कामासाठी अनुभवी होत्या. तज्ज्ञांनी सुरूवातीपासूनच क्लब, रुग्णालयं यांसारख्या ठिकाणांवर लक्ष ठेवलं होते, जेणेकरून संक्रमणाला वाढण्याआधीच कमी करता येईल.
तसंच जपानमध्ये थ्री सी फॉर्मुला वापरण्यात आला होता म्हणजेच Closed spaces, Crowded spaces and Close-contact settings. म्हणजेच बंद ठिकाणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, जवळून संपर्क न साधणं लोकांना एकमेकांपासून दूर ठेवण्याासाठी या फॉर्मुलाचा वापर करण्यात आला होता.
कोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ
चीनी वैज्ञानिकांचा दावा; कोरोना तर काहीच नव्हे 'हा' अज्ञात व्हायरस करु शकतो हल्ला