34 वर्षीय महिला झाली 'सिंगल मदर', अनोळखी व्यक्तीने केली मोठी मदत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 05:29 PM2023-05-02T17:29:19+5:302023-05-02T17:41:46+5:30
Woman Gave Birth To Twins: मनासारखा जोडीदार भेटला नाही म्हणून घेतला निर्णय, गेल्या वर्षी दिला दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.
Woman Gave Birth To Twins: आई होणं प्रत्येक महिलेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण, आई होण्यासाठी एका साथीदाराची गरज असते. पण, एक महिला साथीदाराशिवाय आई झाली आहे. मनासारखा जोडीदार न मिळाल्याने तिने सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. एका अनोळखी व्यक्तीकडून स्पर्म घेऊन तिने प्रेग्नेंसी कन्सिव्ह केली आणि जुळ्या बाळांना जन्म दिला.
साराह मँगट (Sarah Mangat) असे या 34 वर्षीय महिलेनेच नाव आहे. ती कॅनडाच्या टोरंटोमध्ये राहते. तिने सांगितले की, आठ वर्षे सिंगल राहिल्यानंतर तिने हा निर्णय घेतला. या काळात तिला मनासारखा जोडीदार मिळाला नाही. 2020 मध्ये तिने सिंगल मदर म्हणून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती 'स्पर्म बँक'मध्ये गेली, लांबलचक कायदेशीर प्रक्रियेमुळे स्वतःच डोनर निवडायचा निर्णय घेतला.
यादरम्यान फेसबूकवर साराह ओळख एका अनोळखी व्यक्तीशी झाली. हा व्यक्ती Canadian Sperm Donors नावाच्या फेसबूक कम्युनिटीद्वारे तिला भेटला. बातचीतनंतर तो व्यक्ती स्पर्म डोनेट करण्यासाठी तयार झाला. त्याच्या स्पर्मच्या मदतीने साराह गरोदर झाली. 2022 मध्ये साराहने जुळ्या मुलींना जन्म दिला. एलोरा आणि एडिसन असे तिने आपल्या मुलींची नावे ठेवली आहेत. साराह नेहमी आपल्या मुलींचे फोटो शेअर करत असते.