रस्त्यावर फकीर बनून गाण्यासाठी सोनूला रिचर्ड गेरेकडून प्रेरणा मिळाली ?
By admin | Published: May 22, 2016 10:13 AM2016-05-22T10:13:56+5:302016-05-23T10:36:15+5:30
फाटके कपडे, चेह-यावर दाढी, डोळयाला काळा चष्मा अशा फकीराच्या वेशभूषेमध्ये गाण गाणा-या सोनूला कोणीही ओळखू शकल नव्हतं.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - नुकतचं सोनू निगमने फकीराच्या वेशभूषेमध्ये रस्त्यावर गाणे गाऊन सर्वांना धक्का दिला होता. फाटके कपडे, चेह-यावर दाढी, डोळयाला काळा चष्मा अशा फकीराच्या वेशभूषेमध्ये गाण गाणा-या सोनूला कोणीही ओळखू शकल नव्हतं. सोनूने जो हा कौतुकास्पद प्रयत्न केला त्याची प्रेरणा त्याला हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेकडून मिळाली असण्याची शक्यता आहे.
'टाईम आऊट ऑफ माइंड' या आपल्या चित्रपटात रिचर्ड गेरेने अशा प्रकारची रस्त्यावर फिरणा-या बेघर मनोरुग्णाची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी रिचर्ड न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फाटक्या कपडयांमध्ये फिरला होता. कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हे शूटींग करण्यात आले आणि त्या वेशात कोणीही रिचर्डला ओळखू शकलं नाही.
सोनूला रस्त्यावर गाण गाताना एक वेगळा अनुभव आला होता. काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काहींनी रस्त्यात थांबून त्याचे गाणे ऐकले व त्याची चौकशी केली. पण कोणालाही तो सोनू निगम आहे हे ओळखता आले नाही.
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ लोकप्रिय झाल्यानंतर रस्त्यात गाण गाणारा प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम असल्याचं समजलं. रस्त्यावर गाण गाणारे जे गायक आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी हा त्यामागे सोनूचा उद्देश होता.