रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल स्टेशनमध्ये काय फरक असतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 04:44 PM2023-10-12T16:44:46+5:302023-10-12T16:45:17+5:30

जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल, स्टेशन येतात त्याचा अर्थ काय आहे? बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो.

Difference between junction central and terminal in Indian Railways | रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल स्टेशनमध्ये काय फरक असतो?

रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल स्टेशनमध्ये काय फरक असतो?

भारतीय रेल्वे ही आशिया खंडातील सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. तर जगातली चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. एका आकडेवारीनुसार, 2015-16  या एका वर्षात तब्बल 8 अब्जपेक्षा जास्त लोकांनी रेल्वे प्रवास केला होता. तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल पण काय कधी तुम्ही याचा विचार केलाय का की, प्रवासादरम्यान जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल, स्टेशन येतात त्याचा अर्थ काय आहे? बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो. चला आज आपण जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल याचा अर्थ जाणून घेऊ.

* देशभरात 5 हजार ते 8 हजार 500 रेल्वे स्टेशन आहेत. या स्टेशनवरून साधारण 22 मिलियन लोक रोज प्रवास करतात. या रेल्वे स्टेशन्सना मुळात चार भागांमध्ये विभागलं गेलं आहे.

– टर्मिनस
– सेन्ट्रल
– जंक्शन
– स्टेशन

काय असतं टर्मिनस किंवा टर्मिनल ?

टर्मिनस किंवा टर्मिनल याचा अर्थ होतो की, एक असं स्टेशन जेथून रेल्वे पुढे जात नाही. म्हणजे ज्या दिशेने रेल्वे त्या स्टेशनला पोहोचते, तेथून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी त्याच दिशेने पुन्हा उलटा प्रवास रेल्वेला सुरू करावा लागतो.

उदाहरण:

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)
लोकमान्य टिलक टर्मिनस (एलटीटी)
कोचीन हार्बर टर्मिनस
अशाप्रकारचे भारतात एकूण 27 टर्मिनस स्टेशन आहेत.

सेन्ट्रल

सेंट्रल त्या रेल्वे स्टेशनला म्हटलं जातं, ज्यात अनेक स्टेशनचा समावेश असतो. हे शहरातील सर्वात व्यस्त स्टेशन असतं. अनेकजागी जुन्या स्टेशन्सनाही सेंट्रल म्हटलं जातं. भारतात असे एकूण 5 सेन्ट्रल स्टेशन आहेत.

उदाहरण:

मुंबई सेन्ट्रल (बीसीटी)
चेन्नई सेन्ट्रल (एमएएस)
त्रिवेंन्द्रम सेन्ट्रल (टीवीसी)
मैंग्लोर सेन्ट्रल (एमएक्यू)
कानपुर सेन्ट्रल (सीएनबी)

जंक्शन

जंक्शन त्या रेल्वे स्टेशनला म्हटलं जातं, जेथून रेल्वेच्या येण्या-जाण्यासाठी कमीत कमी 3 पेक्षा जास्त वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे रेल्वे कमीत कमी एकत्र दोन रूटवरून येऊ शकते आणि जाऊही शकते.

उदाहरण:

मथुरा जंक्शन (7 मार्ग)
सलीम जंक्शन (6 मार्ग)
विजयवाड़ा जंक्शन (5 मार्ग)
बरेली जंक्शन (5 मार्ग)

स्टेशन

स्टेशन त्या जागेला म्हटलं जातं जेथे रेल्वे प्रवाशांसाठी आणि सामानासाठी थांबते. भारतात एकूण 8 ते साडे आठ हजार स्टेशन आहेत.

Web Title: Difference between junction central and terminal in Indian Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.