अनेकांना माहीत नसतो 'सॉस' आणि 'केचप' मधील फरक, तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:45 PM2023-11-01T12:45:36+5:302023-11-01T12:46:00+5:30

Difference Between Tomato Sauce And Ketchup: टोमॅटो केचप आणि टोमॅटो सॉस तर तुम्ही अनेक चाखलं असेल. पण अनेकांना या दोन्ही फरकच माहीत नसतो.

Difference between tomato sauce and ketchup | अनेकांना माहीत नसतो 'सॉस' आणि 'केचप' मधील फरक, तुम्हाला माहीत आहे का?

अनेकांना माहीत नसतो 'सॉस' आणि 'केचप' मधील फरक, तुम्हाला माहीत आहे का?

Difference Between Tomato Sauce And Ketchup:  सामान्यपणे सगळेच लोक पिझ्झा, बर्गर, चायनीज खाताना टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप आवडीने खातात. त्याशिवाय अनेकांच्या घशाखाली घासही जात नाही. चुकून जर हॉटेलवाला ते देण्यास विसरला तर आवाज देऊन मागवलं जातं. 

टोमॅटो केचप आणि टोमॅटो सॉस तर तुम्ही अनेक चाखलं असेल. पण अनेकांना या दोन्ही फरकच माहीत नसतो. म्हणजे तुम्ही कधी सॉस मागत असाल तर कधी केचप. अनेकांना वाटत असेल की, दोन्ही एकच आहे. पण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

सॉस आणि केचप एक नाही

या दोन्हींमध्ये एक बेसिक फरक असतो. म्हणजे केचप तयार करण्यासाठी टोमॅटोचा वापर होतो. सोबतच यात साखर आणि काही आंबट-गोड मसाले टाकून याला घट्ट तयार केलं जातं. तसेच हे तयार करण्यासाठी गरम करण्याची गरजही नसते.

तेच सॉस तयार करण्यासाठी गरजेचं नाही की यासाठी टोमॅटोच वापरले पाहिजे. सॉस टोमॅटोऐवजी इतरही गोष्टींपासून तयार केलं जातं. यात तेलाचाही वापर होतो. टोमॅटो केचपमध्ये 25 टक्के शुगर असू शकते, पण सॉसमध्ये शुगर नसते. मसाले टाकले जातात.

केचपला तुम्ही सॉसचं मॉर्डन व्हर्जन मानू शकता, जे टोमॅटोपासून तयार होतं. तेच सॉस थोडा जास्त तरल असतो. जो टेस्ट वाढवण्यासाठी जेवणासोबतही दिला जातो.

तसे तुम्ही टोमॅटोच्या चटणीलाही सॉस म्हणू शकता. पण केचप चटणी नाहीये. या दोन्हीत सगळ्यात मोठा फरक हा असतो की, केचपमध्ये साखर आहे पण सॉसमध्ये नाही.

Web Title: Difference between tomato sauce and ketchup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.