'मसाला चहा ते गुलाबी चहा'...चहासोबत असेही प्रयोग! चहाप्रेमींनो एकदा बघाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 01:19 PM2022-11-10T13:19:53+5:302022-11-10T13:22:00+5:30
चहा आवडत नाही असे म्हणणारे सहसा कमीच असतील. चहाप्रेमींना कधीही चहा चालतो. आलं, मसाला, दालचिनी घालून केलेला चहा तर आहाहा...
चहा आवडत नाही असे म्हणणारे सहसा कमीच असतील. चहाप्रेमींना कधीही चहा चालतो. आलं, मसाला, दालचिनी घालून केलेला चहा तर आहाहा...
चहामध्ये अजून काही गोष्टी घातल्या तर चहाची चव अजूनच जबरदस्त लागू शकते. चहाचे सर्वात जास्त उत्पादन तर भारतातच होते. आलं, दालचिनी सोबतच तुम्ही आणखी काय काय वापरु शकता बघा
भारतात अनेक पद्धतींनी चहा बनतो. चहासोबत प्रयोग केले जातात. आल्याचा चहा पासून कुल्हडवाली चाय, काश्मिरी काहवा असे अनेक प्रयोग चहासोबत झाले आहेत. टपरीवर मिळणाऱ्या कटिंग चहासाठी चहाप्रेमींची गर्दी असतेच. कोणी पाहुणे घरी आले की आधी चहाच विचारला जातो. अजून कोणत्याकोणत्या पद्धतीने चहा बनवता येतो.
सोशल मीडियावर गुलाबी चहा चा व्हिडिओ व्हायरल होतोय. अनेकांनी गुलाबी चहा घरी बनवण्याचा प्रयत्न केला. या चहाचा रंग गुलाबी असतो आणि चव लाजवाब. काश्मीरमध्ये दिवसाची सुरुवात या चहानेच होते. याला नून किंवा नमकीन चहा सुद्धा म्हणतात.
कसा बनवतात गुलाबी चहा ?
२ चमचे चहा पावडर, दीड चमचा बेकिंग सोडा, १ चमचा वेलची पावडर, १ दालचिनी, २ कप पाणी २ कप दूध
पाण्यात चहा पावडर घालून उकळी येऊ द्या. त्यानंतर बेकिंग सोडा घालून ढवळत राहा. आता यात वेलची पावडर घालून लाल रंग येईपर्यंत उकळी येऊ द्या. मग यामध्ये दूध घाला. यानंतर गॅस बंद करुन थोडं मीठ घाला. चहा तयार. यामध्ये सुकामेवा काही ठिकाणी घातला जातो
आणखी एक चहाची पद्धत म्हणजे मसाला चहा. आता ही पद्धत सहसा अनेक ठिकाणी वापरली जाते. आलं, दालचिनी, वेलची घालून बनवलेल्या चहाची चव काही औरच असते.