लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले म्हणून दिला घटस्फोट

By admin | Published: October 25, 2016 09:04 AM2016-10-25T09:04:30+5:302016-10-25T09:10:40+5:30

फक्त आणि फक्त पत्नीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले या कारवणावरुन नाराज झालेल्या पतीने पत्नीला घटस्फोट दिला आहे

Divorce photo given to social media as divorced | लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले म्हणून दिला घटस्फोट

लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले म्हणून दिला घटस्फोट

Next
>ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 25 - लग्न होऊन दोन तासही पुर्ण झाले नाहीत तोवर पतीने पत्नीला घटस्फोट दिल्याची घटना सौदी अरबमध्ये घडली आहे. इतक्या लवकर घटस्फोट झाल्याचं जितकं आश्चर्य वाटतं असेल तितकंच आश्चर्य त्याचं कारण वाचूनही होईल. फक्त आणि फक्त पत्नीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले या कारणावरुन नाराज झालेल्या पतीने हा घटस्फोट दिला आहे. 
 
लग्नाचे फोटो पत्नीने स्नॅपचॅटवर शेअर केले होते. आपल्या मित्रांशी फोटो शेअर केल्यानंतर रागवालेल्या पतीने तात्काळ घटस्फोटासाठी अर्ज केला. आपल्या लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर न करण्यासबंधी दोघांमध्येही अगोदरच बातचीत झाल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 
 
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार तरुणीच्या भावाने सौदी दैनिक वृत्तपत्राशी केलेल्या बातचीतमध्ये 'माझी बहिण आणि तिच्या पतीमध्ये लग्नाअगोदर लग्नाचे कोणतेच फोटो किंवा व्हिडीओ स्ऩॅपचॅट, ट्विटर, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर शेअर न करण्यासंबंधी करार झाला होता,' असं सांगितलं आहे.
 
'ही गोष्ट लग्नाच्या करारात नमूद होती. पण माझ्या बहिणीने ती अट पाळली नाही आणि लग्नाचे फोटो आपल्या मित्रांना इंस्टाग्रामवर पाठवले. त्यानंतर घटस्फोट घेण्याचा धक्कादायक निर्णय तिच्या पतीने घेतला असल्याचं', त्याने म्हटलं आहे. तरुणाच्या या निर्णयामुळे मुलीचे कुटुंबिय नाराज झाले असून जर अशी अट घालण्यात आली होती तर तो अन्याय होता असा दावा केला आहे. 
 
तर दुसरीकडे मुलाच्या कुटुंबियांचा घटस्फोटासाठी आमच्याकडे ठोस पुरावा असल्याचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीने आपली पत्नी मेसेज करण्यात जास्त व्यस्त या कारणामुळे आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. 
 

Web Title: Divorce photo given to social media as divorced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.