600 वर्ष जुनं एक असं मंदिर जिथे घटस्फोटाची मनोकामना होते पूर्ण, जाणून घ्या खासियत...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 02:57 PM2023-06-17T14:57:12+5:302023-06-17T15:28:04+5:30
Divorce Temple :अनेक कपल्स त्यांच्या चांगल्यासाठी सोबत मंदिरात अभिषेकही करतात. पण तुम्ही कधी घटस्फोटा करून देणाऱ्या मंदिराबाबत ऐकलं का?
Divorce Temple :आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लोक लोक देवाच्या मंदिरात जातात. कुणाला बिझनेसमध्ये वृद्धी हवी असते तर कुणाला चांगला पती हवा असतो. तर कुणाला आरोग्य चांगलं हवं असतं. त्यांची अशी धारणा असते की, देवासमोर काही चांगलं मागितलं तर ते पूर्ण होतं. अनेक कपल्स त्यांच्या चांगल्यासाठी सोबत मंदिरात अभिषेकही करतात. पण तुम्ही कधी घटस्फोटा करून देणाऱ्या मंदिराबाबत ऐकलं का? कदाचित अनेकांना या मंदिराबाबत काहीच माहीत नसेल. पण एक असं मंदिर आहे.
हे मंदिर 600 वर्ष जुनं असून त्याचं नाव मात्सुगाओका टोकीजी मंदिर आहे. हे मंदिर जपानी संस्कृती आणि इतिहासात फार महत्वाचं मंदिर आहे. हे मंदिर सशक्तीकरण आणि नाविण्याच्या आपल्या खास संदेशासाठी ओळखलं जातं. पण या मंदिराला डिवोर्स टेम्पल म्हणजे घटस्फोटाचं मंदिर म्हणून अधिक ओळखलं जातं.
1285 मध्ये एक बुद्धीष्ट नन काकुसान शिदो-नी यांनी स्थापना केलेलं हे एक बौद्ध मंदिर आहे. सुरूवातीला हे मंदिर गरजू महिलांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी तयार करण्यात आलं होतं. त्यावेळी महिलांची स्थिती वाईट होती आणि त्यांच्याकडे मूलभूत अधिकार नव्हते. तसेच त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधनेही होती. अशात ज्या महिला आपल्या लग्नातून आनंदी नव्हत्या त्या कौटुंबिक हिंसेच्या शिकार होत होत्या, त्याच महिला या मंदिरात येऊन राहत होत्या.
Visited Tokei-ji. The temple had long been known as a shelter for women. In the era when wives could not claim a petition for divorce and needed a letter of divorce from their husbands, the temple functioned as an asylum for women who sought a divorce.#Kamakurapic.twitter.com/bjRi3d2kl4
— Hajime Kimura (@hajime_kimura) December 10, 2021
त्या काळात वेगवेगळ्या समुदायांमध्ये लग्न मोडणं किंवा घटस्फोट होणं मोठी बाब होती, खासकरून महिलांसाठी. नंतर टोकीजी यांनी वैवाहित जीवनात समस्या असणाऱ्या आणि पतीपासून वेगळ्या झालेल्या महिलांना अधिकृत घटस्फोटाचं प्रमाण पत्र देणं सुरू केलं, जे सुफुकु-जी नावाने ओळखले जात होते. याद्वारे त्यांना विवाहातून कायदेशीर स्वातंत्र्य मिळत होतं.
टोकीजी मंदिरात एक संग्रहालय सुद्धा आहे जिथे मंदिराचा इतिहास, वेगवेगळ्या कलाकृती, कागदपत्रे बघायला मिळतात. ज्याद्वारे मंदिराचं महत्व आणि त्या काळात महिलांना सशक्त बनवण्याची भूमिका समजू शकतात.
आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वासोबतच हे मंदिर बौद्ध मंदिरच्या रूपात धार्मिक समारोह, मेडिटेशन सेशनचं सुद्धा आयोजन करतं. मंदिरातील भिक्खु लोकांना मार्गदर्शन करतात.
हिरवळ आणि चेरीच्या झाडांच्या मधोमध या मंदिरात खूप शांतता आहे. ज्याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. लाकडापासून तयार अनेक कलाकृती इथे बघायला मिळतात. तसेच या मंदिराचा बराच भाग लाकडांपासूनच तयार झाला आहे.