भारतात 'या' ठिकाणी साजरी केली जात नाही दिवाळी, ना लक्ष्मी पूजन होत ना लावतात दिवे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 11:53 AM2021-11-02T11:53:14+5:302021-11-02T11:54:37+5:30
Diwali 2021 : भारतातील काही भागांमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही. चला जाणून घेऊन कुठे साजरी केली जात नाही दिवाळी आणि त्यामागचं कारण...
भारतात दिवाळी (Diwali 2021) चा उत्सव सर्वात जास्त आनंदाने साजरा केला जातो. मार्केटमध्ये दिवाळीच्या शॉपिंगपासून ते घरांमधील स्वच्छता जवळपास पूर्ण झाली आहे. दिवाळी देवी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. घरात संपत्ती आणि आनंद कायम रहावा त्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. आता तर परदेशातही दिवाळी साजरी केली जाते. पण भारतातही अशी काही ठिकाणे आहेत जिथे दिवाळी साजरी केली जात नाही. भारतातील काही भागांमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही. चला जाणून घेऊन कुठे साजरी केली जात नाही दिवाळी आणि त्यामागचं कारण...
भारतात काही ठिकाणी दिवाळी साजरी केली जात नाही. या ठिकाणांवर ना लक्ष्मी पूजन होत ना फटाके फोडतात. इतकंच काय तर इथे दिवेही लावले जात नाहीत. ते ठिकाण म्हणजे केरळ (Kerala). केरळ राज्यात इतर ठिकाणांसारखा दिवाळीचा उत्साह बघायला मिळत नाही.
केरळमध्ये ओणनपासून ते ख्रिसमस आणि शिवरात्री मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण जर विषय दिवाळीचा असेल तर इथे दिवाळीचा जल्लोष बघायला मिळत नाही. केरळमध्ये केवळ कोच्चिमध्ये दिवाळी साजरी केली जाते. इथेच तुम्हाला घरांसमोर दिवे लावलेले दिसतील. त्याशिवाय कुठेही दिवाळी साजरी होत नाही.
काय आहे कारण?
यामागे अनेक कारणे आहेत. यातील मुख्य कारण म्हणजे केरळमध्ये महाबलीचं राज्य होतं. महाबली असूर होता आणि त्याचीच इथे पूजा केली जाते. दिवाळी साजरी करण्याचं कारण म्हणजे रावणावर रामाचा विजय. अशात एका राक्षसाचं पराभूत होणं केरळमधील लोक सेलिब्रेट करत नाहीत.
केरळमध्ये हिंदू धर्माचे लोक कमी आहेत. इथे हिंदू लोक कमी आहेत. त्यामुळे इथे दिवाळीचा जल्लोष नसतो. सोबतच केरळमध्ये यावेळी मानसून परत येत असतो. अशात तिथे जोरदार पाऊस असतो. त्यामुळे फटाके आणि दिव्याच्या प्रश्नच येत नाही.
ओणमनंतर दिवाळी...
त्यासोबतच आणखी एक कारण आहे. दिवाळीच्या ठीक आधी इथे ओणम साजरा केला जातो. ओणम येथील सर्वात मोठा सण आहे. अशात लोक त्यांचं सेव्हिंग याच सणाला खर्च करतात. त्यामुळे दिवाळीसाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. केरळ प्रमाणेच तामिळनाडूमध्येही दिवाळीचा जास्त जल्लोष नसतो. दिवाळीआधी इथे नरक चतुर्दशी साजरी केली जाते. इथे यालाच जास्त महत्व आहे.