19 वर्षानंतर आईचं सत्य आल समोर, मुलाला विनंती केली तरी पण संसार झाला उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 12:12 PM2024-02-03T12:12:52+5:302024-02-03T12:13:09+5:30
त्याने सांगितलं की, त्याने गंमत म्हणून त्याची आणि त्याच्या वडिलांची डीएनए टेस्ट करण्यासाठी कीट खरेदी केली. ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं.
अनेकदा अनेक परिवारांमध्ये अनेक रहस्य असतात जे समोर आल्यावर सगळा गोंधळ होतो. त्यावेळी अनेकांना वाटत असतं की, हे सत्य समोर आलं नसतं तर बरं झालं असतं. अशीच एक घटना समोर आली आहे. त्याने सांगितलं की, कशाप्रकारे एका 8 हजार 427 रूपयांच्या डीएनए टेस्टमुळे त्यांच्या परिवारात वादळ उठलं. त्याने सांगितलं की, त्याने गंमत म्हणून त्याची आणि त्याच्या वडिलांची डीएनए टेस्ट करण्यासाठी कीट खरेदी केली. ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं.
या कीटच्या माध्यमातून त्याला त्याच्या आईचं एक रहस्य समजलं. रेडिटवर त्याने लिहिलं की, 'आम्हाला काही दिवसांआधी आमच्या डीएनएचे रीझल्ट मिळाले. ते बघून मला धक्का बसला'.
तो म्हणाला की, 'सगळ्यात आधी माझ्या माझ्यासोबतचं वडिलांचं मॅच केवळ 29.2 टक्के दाखवण्यात आलं आणि त्यांचा सावत्र भाऊ असण्याची भविष्यवाणी करण्यात आली. जी शक्य नाही'. पण नंतर त्याला माहीत पडलं की, तो त्याच्या चुलत बहिणींसोबत 24.6 टक्के डीएनए मॅच करतो. यातूनही स्पष्ट होतं की, त्या त्याच्या सावत्र बहिणी असतील. कारण सामान्यपणे चुलत भाऊ-बहिणींमध्ये डीएनए केवळ 12 टक्के डीएनए एकसारखा असतो.
त्याने पुढे सांगितलं की, मी कोणत्याही जेनेटिक रिलेशनशिपबाबत विचार करू शकत नव्हतो. पण सगळे बिंदू जोडल्यावर समजलं की, माझे काका डेविड माझे वडील आहेत. मी सरळ आईकडे गेलो आणि तिला याबाबत विचारलं की, तिने तिच्या पतीला दगा दिला होता का?
हे ऐकल्यावर त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता. ती शांत होती आणि म्हणाली की, हा कसा प्रश्न आहे? त्यानंतर त्याने डीएनए टेस्टबाबत तिला सांगितलं. तेव्हा ती रडत होती. त्याची आई रडत रडत जमिनीवर पडली आणि म्हणाली की, याबाबत वडिलांना काही सांगू नको. आईने सत्य कबूल केल्यावर त्याने त्याच्या चुलत बहिणीला फोन करून याबाबत सगळं सांगितलं.
तो म्हणाला की, 'चुलत बहीण माझ्यावर ओरडली आणि तिने फोन कट केला. माझे वडील घरी आले आणि माझ्या रूममध्ये येऊन विचारलं की, आईला काय झालं? मी त्यांना सगळं काही खरं सांगितलं. ते काहीच बोलले नाहीत. ते रूममधून बाहेर गेले आणि मी दरवाजा बंद केला. बाहेर आई-वडिलांमध्ये वाद सुरू होता. तो धावत गेला आणि म्हणाला की, ही सगळी माझी चूक आहे. मी जर डीएनए टेस्ट केली नसती तर हे झालं नसतं.