टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:22 PM2021-09-09T12:22:33+5:302021-09-09T12:24:18+5:30

तुम्ही कधी विचार केलाय का की, गोळ्यांच्या पॅकेटवर ही लाल रंगाची रेषा का असते? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो.

Do you know the meaning of red colour strip on medicine | टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान

टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान

googlenewsNext

असे फार कमी लोक असतील जे डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय केमिस्टकडून औषध खरेदी करताना एमआरपी आणि एक्सपायरी डेटशिवाय टॅबलेटच्या पॅकेटच्या मागच्या बाजूवरील इतर माहीत वाचत असतील. सर्व औषधांच्या पॅकेटवर त्या औषधाची एक्सपायरी डेट  आणि किंमत असते. जर तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर गोळ्यांच्या स्ट्रीपवर मागच्या बाजूला इतर माहितीसोबतच एक लाल रंगाची रेषाही असते. तुम्ही कधी विचार केलाय का की, गोळ्यांच्या पॅकेटवर ही लाल रंगाची रेषा का असते? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो.

का असते ही लाल रेषा?

आरोग्य मंत्रालयानुसार, गोळ्यांच्या ज्या पॅकेटवर अशाप्रकारची लाल लाइन असते, ती औषधं तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये. केमिस्टना ही औषधं विकण्याची परवानगी केवळ तेव्हाच दिली जाते जेव्हा या औषधांसाठी एखाद्या डॉक्टरने तुम्हाला चिठ्ठी दिली असेल. (हे पण वाचा : टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही....)

अ‍ॅंटीबायोटिक औषधांच्या दुरूपयोगावर लक्ष ठेवण्यासाठी औषधांच्या पॅकेटवर लाल रेषा दिली जाते. स्ट्रीपवर लाल रेषा देण्याचा उद्देश टीबी, मलेरिया, लघवीसंबंधी संक्रमण आणि इतकंच काय तर एचआयव्हीसहीत अनेक गंभीर आजारांसाठी डॉक्टरांच्या परवानगी शिवाय किंवा थेट केमिस्टकडून अ‍ॅंटीबायोटिकच्या खरेदी-विक्रीला रोखणं हा आहे. 

आरोग्य आणि परिवार मंत्रालयानुसार, अशाप्रकारची औषधं खासकरून अ‍ॅंटीबायोटिक्स ज्यांच्या पॅकेजिंगवर लाल रेषा असते, त्यांचा वापर एखाद्या योग्य डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कधीही करू नये. जागरूक रहा, सुरक्षित रहा.

काय आहे Rx चा अर्थ?

आता आपण बघुया की, काही औषधांच्या पॅकेटवर Rx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारचं औषध घेतलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

काय आहे NRx चा अर्थ?

काही औषधांच्या पॅकेटवर NRx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे नशेचं औषध आहे आणि हे केवळ तेच विकू शकतात ज्यांच्याकडे याचं लायसन्स आहे.

XRx चा अर्थ?

काही औषधांच्या पॅकेटवर XRx असं लिहिलेलं असतं. हे एक असं औषध आहे जे केवळ डॉक्टर विकू शकतात आणि त्यांच्याकडे यांचं लायसन्स असावं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध मेडिकल स्टोरमधून खरेदी करू शकत नाही. भलेही तुमच्याकडे डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठीही असेल तरी.

तुम्ही तुमच्या मित्रांना-नातेवाईकांना याची माहीत द्या जे नेहमीच औषधांचं सेवन करतात. कोणत्याही औषधाचं सेवन करण्याआधी त्यांच्या लेबलवरील माहित वाचा, विचारा आणि तपासा. कारण त्याबाबत माहिती असणं फार महत्वाचं आहे. 

Web Title: Do you know the meaning of red colour strip on medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.