हा आहे जगातील सगळ्यात महागडा धातू, सोन्यापेक्षाही जास्त आहे किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:29 PM2023-12-18T16:29:53+5:302023-12-18T16:30:18+5:30
चला जाणून घेऊ या धातुमध्ये असं काय आहे आणि त्याची मागणी दिवसेंदिवस का वाढत आहे.
पृथ्वीवर एकापेक्षा एक अशा मौल्यवान वस्तू आहे ज्या थोड्या जरी सापडल्या तरी व्यक्ती मालामाल होईल. सोनं, चांदी, यूरेनिअम त्यांपैकी एक आहे. पण धातू असाही आहे ज्याची किंमत यांच्यापेक्षाही जास्त आहे. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिथे हा धातू आढळल्याची माहिती मिळते, तेव्हा श्रीमंत देश त्याकडे धाव घेतात. कार कंपन्या यावर नजर ठेवून असतात. चला जाणून घेऊ या धातुमध्ये असं काय आहे आणि त्याची मागणी दिवसेंदिवस का वाढत आहे.
सध्या जगात सगळ्यात महागडा धातू म्हणजे पॅलेडिअम आहे. दक्षिण आफ्रिकेत पॅलेडिअमला प्लॅटिनमच्या एक बाइप्रोडक्टसारखं काढलं जातं. रशियात याला निकलच्या बाइप्रोडक्टसारखं काढलं जातं. या दोन्ही ठिकाणी पॅलेडिअम सगळ्यात जास्त आढळतं. एक्सपर्टनुसार, याची किंमत वेगाने इतकी वाढली कारण जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाहीये.
गाड्यांमध्ये होतो वापर
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याचा वापर कशात केला जातो? या चमकदार धातुचा वापर गाड्यांच्या उत्सर्जन प्रणालीत होतो. जो नुकसानकारक तत्वांना कार्बन डाइऑक्साइड आणि वाफेत बदलतो. पेट्रोल गाड्यांमध्ये एक्ज़ॉस्टमध्ये वापरला जाणारं कॅटेलिस्टही यापासून तयार केलं जातं. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक, ज्वेलरी आणि दंत चिकित्सेतही याचा वापर केला जातो. सगळ्या देशांचे सरकार प्रदूषणाबाबत नियम कडक करत आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये याचा वापर जास्त होत आहे.
900 टक्के वाढली किंमत
या धातुची मागणी इतकी वाढली आहे की, याची किंमत एका वर्षात दुप्पट झाली आहे. 10 ग्रॅम सामान्य पॅलेडिअमची किंमत 60 हजार रूपये आहे. तेच चांगल्या पॅलेडिअमबाबत सांगायचं तर 10 ग्रॅम पॅलेडिअम सामान्यपणे 80 हजार रूपयांमध्ये मिळतं. 2000 सालापासून याच्या किंमतीत 900 टक्के वाढ झाली आहे. येत्या काळात याची मागणी वाढणार आहे कारण कार बनवणाऱ्या कंपन्या याचा वापर वाढवत आहे.