मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म आणि एन्ट्रीला पिवळ्या रंगाची लाईन का असते?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:17 PM2019-06-24T14:17:19+5:302019-06-24T14:26:31+5:30
दिल्ली आणि मुंबई शहरातील मेट्रो सेवा प्रवाशांसाठी वरदानच ठरली आहे. दिल्लीमध्ये तर मेट्रोने फारच फायदा झाला आहे.
दिल्ली आणि मुंबई शहरातील मेट्रो सेवा प्रवाशांसाठी वरदानच ठरली आहे. दिल्लीमध्ये तर मेट्रोने फारच फायदा झाला आहे. दिल्लीच्या प्रत्येक ठिकाणी आता मेट्रो पोहोचते. फार कमी वेळातच दिल्ली आणि मुंबई मेट्रोने लोकांच्या मनातही घर केलं आहे. कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वात चांगली सुविधा मानली जाते.
अनेकांनी कधीना कधी मेट्रोने प्रवास केला असेल आणि मेट्रोच्या सुविधाही अनेकांना माहीत असतील. पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या प्रवासाच्या धावपळीत दुर्लक्षित राहतात. किंवा त्याकडे फारसं कुणी लक्षही देत नाही. याचं एक उदाहरण म्हणजे मेट्रो स्टेशनवर असलेली पिवळ्या रंगाच्या लाईन्स.
मेट्रोमध्ये प्रवास केला असेल तर ही लाइन तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण त्याकडे फार लक्ष दिलं नसेल. पण कधी विचार केलाय का की, ही पिवळ्या रंगाची लाईन का दिलेली असते? ही का तयार केली जाते? नसेल माहीत तर चला जाणून घेऊ या पिवळ्या लाईन्सचा अर्थ.
जेव्हाही तुम्ही मेट्रोची वाट पाहत असता तेव्हा एक अनाउंन्समेंट होते, 'कृपया पिवळ्या लाईनच्या मागे उभे रहा'. ही घोषणा सुरक्षा कारणांमुळे केली जाते. मेट्रो प्लॅटफॉर्मवर तर पिवळी रेषा असतेच. सोबतच मेट्रो स्टेशनच्या एन्ट्रीपासून ते प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत ही पिवळी रेषा दिसते.
मेट्रो स्टेशनवर ही पिवळी टाइल्स टेक्टाइल पेविंग असतात. जी नेत्रहीन लोकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीच्या उद्देशाने तयार केलेली असते. याच्या मदतीने नेत्रहीन लोक त्यावर चालून त्यांच्या छडीच्या मदतीने रस्त्याची योग्य माहिती घेऊ शकतात.