भारतात एका रेल्वेची किती असते किंमत? जाणून घ्या उत्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:57 AM2023-06-08T09:57:00+5:302023-06-08T09:57:20+5:30
Indian Railway :तुम्ही कधी विचार केलाय का की, एक रेल्वे बनवण्यात किती खर्च येतो. नुकताच बालासोर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न सोशल मीडियावर समोर आला.
Indian Railway : भारतीय रेल्वे जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतात साधारण 13500 पेक्षा जास्त रेल्वे चालतात. जास्तीत जास्त लोक प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. रेल्वेचं तिकीटही कमी असतं आणि प्रवास आरामदायक असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, एक रेल्वे बनवण्यात किती खर्च येतो. नुकताच बालासोर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न सोशल मीडियावर समोर आला.
जनरल, स्लीपर आणि एसी कोच
बालासोरमध्ये झालेल्या दुर्घटनेने देशाला हादरवलं आहे. या घटनेत तीन रेल्वेंची टक्कर भीषण टक्कर झाली. अशात चला जाणून घेऊ एक कोच आणि एका इंजिनासोबतच रेल्वेच्या डब्याची किंमत किती असते. रेल्वेमध्ये वेगवेगळे कोच असतात. ज्यात जनरल, स्लीपर आणि एसी कोच यांचा समावेश आहे. हे कोचही वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
इंजिनाची किंमत वेगळी
एका मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वेचा एक स्लीपर कोच बनवण्यासाठी 1.5 कोटी रूपये खर्च येतो. तेच जनरल कोच बनवण्यासाठी एक कोटी रूपये खर्च येतो. तर एसी कोच बनवण्यासाठी साधारण दोन कोटी रूपये खर्च होतात. अशात जर एखाद्या रेल्वमध्ये 24 कोच आहेत आणि रेल्वे एसी असेल तर याचा खर्च 48 कोटींच्या आसपास असतो. तर इंजिनाची किंमत वेगळी असते.
वंदे भारतची किंमत
एका दुसऱ्य मीडिया रिपोर्टमध्ये रेल्वेच्या अधिकृत कागदपत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, एक इंजिन बनवण्यासाठी वीस कोटी रूपयांचा खर्च येतो. जर एखाद्या रेल्वेमध्ये 10 स्लीपर आणि 8 एसीसोबत दोन जनरल कोच असेल तर त्यासाठी साधारण 50 कोटी रूपये खर्च येतो. त्यासोबतच हेही जाणून घ्या की, सगळ्यात आधुनिक रेल्वे वंदे भारतची किंमत 115 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. अशाप्रकारे अंदाज लावू शकता की, कोचनुसार एका रेल्वेची किंमत किती असते.
(Image Credit : Wikipedia)