रेल्वेच्या बोगी आणि कोचमधील फरक माहीत आहे का? 99 लोकांना नसेल माहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 03:07 PM2023-09-26T15:07:08+5:302023-09-26T15:07:25+5:30

Railway Interesting Facts : बऱ्याच लोकांनी रेल्वेच्या बोगी किंवा कोचमध्ये प्रवास केला असेल. पण त्यांना या शब्दांचा अर्थ माहीत नसतो.

Do you know the difference between railway bogie and coach 99 percent people dont know | रेल्वेच्या बोगी आणि कोचमधील फरक माहीत आहे का? 99 लोकांना नसेल माहीत!

रेल्वेच्या बोगी आणि कोचमधील फरक माहीत आहे का? 99 लोकांना नसेल माहीत!

googlenewsNext

Railway Interesting Facts : आपल्या जीवनात रोज आपण अशा गोष्टींबाबत ऐकत किंवा वाचत असतो ज्यांबाबत आपल्याला काहीच माहीत नसतं. ऐकलेल्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो, पण त्याचं सत्य माहीत नसतं. रेल्वेने तर सगळेच प्रवास करतात, पण त्याबाबतच्या अनेक गोष्टी लोकांना माहीत नसतात. आज अशीच एक कॉमन बाब आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर लोकांना रोज बोलल्या जाणाऱ्या ओके आणि सॉरी शब्दांचा खरा अर्थ माहीत नसतो तर मग त्यांना रेल्वे प्रवासाबाबतच्या अनेक शब्दांचा अर्थही माहीत नसतो. बऱ्याच लोकांनी रेल्वेच्या बोगी किंवा कोचमध्ये प्रवास केला असेल. पण त्यांना या शब्दांचा अर्थ माहीत नसतो. चला आज आम्ही तुम्हाला या दोन्हीतील फरक सांगणार आहोत.

बोगी आणि कोचमधील फरक

रेल्वेने तर सगळेच प्रवास करतात आणि याच्या वेगवेगळ्या भागांबाबत बोललंही जातं. तुम्ही पाहिलं असेल की, लोक नेहमीच रेल्वेच्या डब्यासाठी बोगी नंबरचा वापर करतात. असं असेल तर मग कोच ही काय भानगड आहे? आपण कोचमध्ये प्रवास करतो की, बोगीमध्ये? 

कदाचित तुम्हीही याचा कधी गंभीरतेने विचार केला नसेल. पण आता हे जाणून घ्या की, रेल्वेमध्ये बोगी व कोच वेगवेगळे आहेत आणि यात तेवढाच फरक आहे जेवढा घराच्या पायात आणि घरात असतो. बोगी पाया आहे तर कोच अशी जागा आहे जिथे आपली सीट लागलेली असते आणि त्यावर आपण प्रवास करतो.

रेल्वेमध्ये बोगी असे चार चाकं असते जी एक्सेल म्हणजे लोखंडाच्या जाड रॉडने जुळलेली असते. कोच आणि बोगी फ्रेममध्ये स्प्रिंग असते. जी आपल्याला प्रवासादरम्यान लागणाऱ्या झटक्यांपासून वाचवते. या पूर्ण बेसवर कोच किंवा डबा ठेवला जातो.

बोगीमध्ये ब्रेक डिस्क आणि सस्पेंशनसारख्या गोष्टी लागलेल्या असतात. तेच कोच रेल्वेच्या डब्याला म्हटलं जातं. ज्यात दोन भाग असतात एक म्हणजे कंपार्टमेंट आणि दूसरा लॉन. कम्पार्टमेंट 8 सीट्सच्या एका भागाला म्हटलं जातं. तर मधला जो भाग असतो तो कॉरिडोर असतो, त्याला लॉन म्हणतात.

Web Title: Do you know the difference between railway bogie and coach 99 percent people dont know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.