जाणून घ्या बाथरूम आणि वॉशरूममधील फरक, चारचौघात होणार नाही हसू!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:39 AM2023-09-15T10:39:04+5:302023-09-15T10:41:41+5:30
वॉशरूम आणि रेस्ट रूमचाही वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. पण बरेच लोक दोन्हीना एकच मानतात.
वॉशरूम, बाथरूम हे शब्द आता आपल्या रोजच्या जीवनात कॉमन झाले आहेत. दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहेत. पण अनेकांना हे माहीत नसतं की, बाथरूम आणि वॉशरूम यात बराच फरक असतो. वॉशरूम आणि रेस्ट रूमचाही वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. पण बरेच लोक दोन्हीना एकच मानतात.
सगळेच घरात किंवा ऑफिसमध्ये ब्रेकवेळी वॉशरूमला जातोच. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वॉशरूम आणि बाथरूममध्ये काय अंतर आहे. कोणती गोष्ट कशासाठी बनली आहे आणि या एकमेकांपासून वेगळ्या कशा आहेत.
बाथरूम - बाथरूम म्हणजे जिथे आंघोळ करण्याची सुविधा असते, जसे की, बकेट, इत्यादी. पण अनेकदा यात टॉयलेटही असू शकतं. बाथरूममध्ये टॉयलेट सीट असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही.
वॉशरूम - अनेक ठिकाणी वॉशरूम जेंडरच्या हिशेबाने वेगवेगळे असतात. वॉशरूममध्ये हाथ धुण्यासाठी एक सिंक आणि टॉयलेट सीट असते. कधी कधी यात आरसाही असतो. वॉशरूम जास्तकरून मॉल्स आणि थिएटरमध्ये असतात.
रेस्ट रूम - रेस्ट रूमचा रेस्टशी काहीही संबंध नसतो. हा शब्द अमेरिकन इंग्रजीतून आला आहे. अमेरिकेत वॉशरूमला रेस्ट रूम म्हटलं जातं.
लॅवेटरी - लॅवेटरी हा लॅटीन भाषेतील शब्द आहे, लॅटीनच्या लेवेटोरिअमचा अर्थ वॉश बेसिन किंवा वॉशरूम झाला. हळूहळू याची जागा वॉशरूमने घेतली. म्हणजे लॅवेटरीचा अर्थ वॉशरूम असाच होतो.
टॉयलेट - टॉयलेट ही एक अशी जागा आहे जिथे सामान्यपणे केवळ एक टॉयलेट सीटच असते. ज्यात तुम्ही तुमची सकाळची नैसर्गिक क्रिया पूर्ण करता. यात दुसरी सुविधा नसते.