खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? खातात सगळेच पण माहीत कुणालाच नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:19 AM2023-05-25T11:19:18+5:302023-05-25T11:19:43+5:30

English Of Khichdi: तुम्हाला माहीत आहे का की, खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्वचितच याचं उत्तर कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ याचं उत्तर...

Do you know the English word for khichdi you will shock to know | खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? खातात सगळेच पण माहीत कुणालाच नसेल!

खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? खातात सगळेच पण माहीत कुणालाच नसेल!

googlenewsNext

English Of Khichdi: भारतात तर सगळ्याच घरांमधील लोकांना खिचडी माहीत आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र करून खिचडी बनवली जाते. यात काही लोक भाज्या, तूप आणि टेस्टनुसार मसालेही टाकतात. खिचडी सहजपणे पचते आणि शरीराला याचे अनेक फायदेही मिळतात. तुम्हीही अनेकदा खिचडी खाल्ली असेल, पण तुम्हाला माहीत आहे का की, खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्वचितच याचं उत्तर कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ याचं उत्तर...

खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात?

नुकताच असा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात आला होता. त्यावर अनेकांनी उत्तरे दिली. हे सत्य आहे की, अनेकांना खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे माहीत नाही. अशात तुम्हाला सांगणार आहोत की, खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. खिचडीला इंग्रजीमध्ये hotchpotch असं म्हटलं जातं.

2500 वर्ष जुना आहे इतिहास

जगभरात हेल्दी डाएट म्हणून खिचडीकडे पाहिलं जातं. या खिचडीचा इतिहास 2500 वर्षापेक्षा जुना आहे. तांदूळ आणि डाळ सोबत शिजवून खिचडी तयार केली जाते. यात काही लोक भाज्या किंवा मसाले टाकतात. याचं चलन मुघल काळापासून चालत आलं आहे. यादरम्यान खिचडी इतकी फेमस झाली की, याचा समावेश शाही भोजनाच्या लिस्टमध्ये करण्यात आला.

लगेच तयार होणारं जेवण

खिचडी तयार करण्यासाठी तांदूळ आणि डाळ धुवून पाण्यात भिजवली जाते. नंतर एकत्र कुकरमध्ये टाकून शिजवली जाते. यात मसाले कमीच असतात, पण हळद, मीठ हे टाकलं जातं. सामान्यपणे  खिचडी लगेच तयार होते आणि पौष्टिक असते.

खिचडीमध्ये पोषक तत्व भरपूर असतात. पचनासंबंधी समस्या असेल तर याने लगेच दूर होते. शक्ती मिळवण्यासाठीही खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पोट खराब असेल तर मूगाच्या डाळीची खिचडी खाल्ली जाते. खिचडीचं सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतात. 

Web Title: Do you know the English word for khichdi you will shock to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.