टुथपेस्ट ट्युबच्या खाली असलेल्या या रंगांचा अर्थ माहितीये? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:41 PM2022-12-01T20:41:58+5:302022-12-01T20:42:27+5:30

Do you know : कधी तुम्ही टुथपेस्टच्या ट्युबकडे लक्ष दिलंय? असं असेल तर तुमचं लक्ष त्याच्या मागे असलेल्या कलर कोडवरही गेलं असेल. माहितीये ते काय असतं?

Do you know the meaning of colors under the toothpaste tube find out Colgate clarifies | टुथपेस्ट ट्युबच्या खाली असलेल्या या रंगांचा अर्थ माहितीये? जाणून घ्या

टुथपेस्ट ट्युबच्या खाली असलेल्या या रंगांचा अर्थ माहितीये? जाणून घ्या

Next

आपण रोज सकाळी सर्वप्रथम ब्रश करतो. ब्रश करताना तुम्ही कधी लक्ष दिले असेल तर टूथपेस्टच्या खालच्या बाजूला कलर बार दिलेला असेल. वेगवेगळ्या टूथपेस्टच्या ट्युब्सवर निरनिराळ्या रंगाच्या पट्ट्या दिल्या जातात. या रंगाच्या पट्ट्या का दिल्या जातात याचा कधी विचार केला आहे का? या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ काय आहे?

तुम्ही सोशल मीडियावर टूथपेस्टच्या मागे लाल, हिरवा, काळा आणि निळा रंग टूथपेस्टमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकांचा संदर्भ देत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक साइट्स पाहिल्या असतील. सोशल मीडियावर असे म्हटले जाते की पेस्टवरील हिरव्या चिन्हाचा अर्थ असा आहे की टूथपेस्ट पूर्णपणे नैसर्गिक आहे, निळ्या चिन्हाचा अर्थ आहे की त्यात नैसर्गिक घटक आणि औषधांचे मिश्रण आहे, लाल चिन्हाचा अर्थ आहे की त्यात नैसर्गिक घटक आणि रासायनिक घटक आहेत आणि ब्लॅक मार्क म्हणजे त्यात सर्व रासायनिक घटक असतात. पण या दाव्यात किती तथ्य आहे?

काय आहे अर्थ?
ओरल हेल्थ केअर कंपनी कोलगेटने आपल्या वेबसाइटवर या दाव्यांचं खंडन केलं आहे आणि या बार कोडचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे. कोलगेटने सांगितले की, टूथपेस्टवर बनवलेल्या या रंगीबेरंगी पट्ट्यांचा त्यात पडणाऱ्या घटकांशी काहीही संबंध नाही. कोलगेटचे म्हणणे आहे की या कलर कोडचे कारण टूथपेस्टच्या ट्युब्स बनवण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे.

कोलगेटच्या म्हणण्यानुसार, टूथपेस्टचा रंग ट्यूब बनवणाऱ्या मशीनमध्ये बसवलेल्या लाईट सेन्सरला सूचित करतो की ट्यूब कोणत्या प्रकारची आणि आकाराची आहे. त्याच वेळी, कोणत्या ठिकाणाहून कापायची आहे आणि सीलही करायची आहे.

Web Title: Do you know the meaning of colors under the toothpaste tube find out Colgate clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.