Gas Cylinder वर लिहिलेल्या नंबरांचा अर्थ काय होतो? यात लपलेली आहे महत्वाची माहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 09:25 AM2022-11-29T09:25:44+5:302022-11-29T09:26:05+5:30
Gas Cylinder Expiry Date: सिलेंडरवर आणखीही एक कोड लिहिलेला असतो. ज्याचा अर्थ फार कमी लोकांना माहीत असतो. चला जाणून घेऊ गॅस सिलेंडर लिहिलेल्या कोडचा अर्थ काय होतो.
Gas Cylinder Expiry Date: देशातील काही शहरांमध्ये गॅसचा सप्लाय आता पाइपलाईनने होत आहे. तरीही देशातील जास्तीत जास्त घरांमध्ये गॅस अजूनही सिलेंडरच्या माध्यमातूनच येतो. घरात गॅस सिलेंडर आणल्यावर सगळ्याचं लक्ष आधी वजनाकडेच जातं. पण सिलेंडरवर आणखीही एक कोड लिहिलेला असतो. ज्याचा अर्थ फार कमी लोकांना माहीत असतो. चला जाणून घेऊ गॅस सिलेंडर लिहिलेल्या कोडचा अर्थ काय होतो.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, प्रत्येक वस्तू प्रमाणे गॅस सिलेंडरही एक्सपायरी डेट असते. जी त्यावर लिहिलेली असते. सिलेंडरवर A,B,C आणि D आणि त्यासोबत अंक लिहिलेला असतो. तुम्ही पाहिलं असेल की, सिलेंडरवर A-23, B-24 किंवा C-25 असं लिहिलेलं असतं.
A,B,C आणि D महिन्यांकडे इशारा करतात. A- जानेवारी ते मार्च पर्यंतचा महिना दर्शवतो. B चा अर्थ एप्रिल ते जून असा होतो. C चा अर्थ जुलै ते सप्टेंबर होतो. तर D चा अर्थ ऑक्टोबर ते डिसेंबर असा होतो.
A,B,C आणि D या अल्फाबेटच्या पुढे काही नंबर लिहिलेले असतात. हे नंबर सिलेंडर एक्स्पायर होण्याच्या वर्षाबाबत सांगतात. जर तुमच्या सिलेंडरवर C-23 लिहिलेलं असेल तर तुमचा किचनमधील गॅस सिलेंडर 2023 मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यात एक्स्पायर होणार.