एका लीटरमध्ये किती मायलेज देतं एक विमान, वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 03:12 PM2022-09-16T15:12:23+5:302022-09-16T15:13:27+5:30
Airplane Milage : अलिकडे अनेकजण विमानाने सहज प्रवास करत असले तरी अनेकजण असेही आहेत जे अजूनही विमानाने प्रवास करू शकले नाहीत. त्यांच्यासोबतच अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, एरा लिटरमध्ये विमान किती किलोमीटरचा मायलेज देत असेल? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
Airoplane Milage : कुणीही कार किंवा बाइक विकत घ्यायला जातं तेव्हा ते आवर्जून एक प्रश्न विचारतात की, गाडीचा मायलेज किती आहे? म्हणजे एका लीटरमध्ये गाडी किती किलमीटर चालते? पण कधी कुणी विमानाच्या मायलेजचा विचार केला नसेल. बालपणापासूनच प्रत्येकालाच आकाशात उडणाऱ्या विमानाबाबत क्रेझ असते. विमानाचे पंखे असोत वा विमानाची चाके प्रत्येक गोष्टीबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागलेली असते. अलिकडे अनेकजण विमानाने सहज प्रवास करत असले तरी अनेकजण असेही आहेत जे अजूनही विमानाने प्रवास करू शकले नाहीत. त्यांच्यासोबतच अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, एरा लिटरमध्ये विमान किती किलोमीटरचा मायलेज देत असेल? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान प्रति सेंकदाला जवळपास ४ लिटर इंधन खर्च करतं. जर विषय बोइंग ७४७ चा सांगायचं तर एक मिनिटाच्या प्रवासादरम्यान हे विमान २४० लिटर इंधन खर्च करतं.
बोइंगच्या वेबसाइटने दिलेल्या आकडेवारीनुसार, बोइंग ७४७ विमानात १० तासांच्या उड्डाणादरम्यान ३६ हजार गॅलन म्हणजेच १, ५०, ००० लिटर इंधनाचा वापर होतो. या विमानात प्रति मैल साधारण ५ गॅलन इंधन(१२ लिटर प्रति किलोमीटर) जळतं.
जर बोइंग ७४७ एका किलोमीटरमध्ये १२ लिटर इंधन खर्च करतं, तर याचा अर्थ हा होतो की, हे विमान ५०० प्रवाशांना १२ लिटर इंधनात जवळपास एक किलोमीटर प्रवास करवतं. यानुसार, विमान एक किलोमीटरमध्ये प्रति व्यक्तीवर केवळ ०.०२४ लिटर इंधन खर्च करतं.
रिपोर्टनुसार, बोइंग ७४७ सारखं विमान एक लिटरमध्ये किती चालतं? या प्रश्नाचं उत्तर असेल ०.८ किलोमीटर, हे ऐकायला फारच कमी वाटतं. हे विमान १२ तासांच्या प्रवासादरम्यान १७२, ८०० लिटर इंधन खर्च करतं.