बाबो! 'हे' आहेत जगातले सर्वात रंगेल अन् मजा मारणारे नेते, त्यांच्या रंगेलीचे किस्से वाचून व्हाल थक्क...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 12:41 PM2021-01-13T12:41:38+5:302021-01-13T12:42:30+5:30
काहीही झालं तरी त्यांनी आयुष्यात मजा करणं कधी थांबवलं नाही. आधुनिक युगात काही असे अय्याश लोक झाले आहेत की, त्यांनी मध्ययुगातील राजांच्या हरमला मागे टाकलं आहे.
जगभरात सनकी किंवा रंगेल लोकांची काही कमतरता नाही. हे लोक शारीरिक संबंधासाठी इतके हापापलेले होते की, त्यांनी शेकडो-हजारो महिलांसोबत संबंध ठेवले. यातील काही कट्टरपंथी आहेत तर काही हुकूमशहा आहेत. काहीही झालं तरी त्यांनी आयुष्यात मजा करणं कधी थांबवलं नाही. आधुनिक युगात काही असे अय्याश लोक झाले आहेत की, त्यांनी मध्ययुगातील राजांच्या हरमला मागे टाकलं आहे.
या धार्मिक नेत्याला मिळाला १०७५ वर्षांची शिक्षा
रंगेल अदनान ओकतार. तो तुर्कीमध्ये मुस्लिमांच्या एका पंथाचा नेता आहे आणि इस्तांबुलच्या एका कोर्टाने त्याला १० वेगवेगळ्या प्रकरणात १०७५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान अदनानने कोर्टात सांगितले की, त्याच्या १००० गर्लफ्रेन्ड आहेत. तो त्याच्या लोकांना कट्टरपंथाचा उपदेश देतो. तो महिलांना मांजर म्हणून बोलवत होता.
एका रिपोर्टनुसार, अदनानवर लैंगिक अपराध, अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषणसहीत अनेक आरोप आहेत. सुनावणी दरम्यान त्याने एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले की, 'माझ्या वडील होण्याची असाधारण क्षमता आहे'. अनेक महिलांनी अदनानवर बलात्काराचा आरोप लावला आहे आणि सांगितले की, त्याने त्यांना गर्भनिरोधक खाण्यास भाग पाडलं. अदनानच्या घरातून ७० हजार गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या आहेत.
बर्लुस्कोनीचे सेक्स स्कॅंडल
इटलीचा माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनीवर अनेक सेक्स स्कॅंडलचे आरोप आहेत. बर्लुस्कोनीवर त्याच्या पत्नीनेच अल्पवयी मुलींसोबत संबंध ठेवण्याचा आरोप केला होता. तो त्याच्या बुंगा बुंगा पार्ट्यांसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या घराच्या तळघरात या पार्ट्यांचं आयोजन होत असे. तिथे तो मुलींसोबत मजा करत असे. कोर्टाने त्यालाही दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.
किम जोंग इलचा प्लेजर स्क्वॉड
उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उनचे वील किम जोंग इलच्या काळात त्याचा एक सीक्रेट प्लेजर स्क्वॉड होता. या स्क्वॉडमध्ये शाळेतील मुलींचा समावेश होता. त्यावेळी १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलींना बळजबरी उचलून नेत होते. हुकूमशहाचा रंगेलपणा लपवण्यासाठी मुलींना सैन्यात भरती केल्याचं नाटक केलं जात होतं. त्यांना गिप्पेमजो म्हटलं जायचं.
गिप्पेमजोमध्ये २ हजार मुलींचा सहभाग असे आणि त्या हुकूमशहासाठी प्रत्येक वेळी तयार असायच्या. त्यांची जबाबदारी हुकूमशहाला सर्व प्रकारे आनंदी ठेवायची होती. किम जोंग इलच नाही तर त्यांचे अनेक राजकीय पाहुणेही या मुलींचं शोषण करत असे.
सद्दाम हुसेन
सद्दाम हुसेन हा सुद्धा बायकांचा शौकीन होता. त्याला विवाहित बायका जास्त आवडत होत्या. तो त्याच्या खास गार्डला विवाहित बायकांना उचलून आणयला सांगत असे. मग ती कुणाचीही पत्नी असो. शाळेतील मुलींचंही अनेकदा तो शोषण करत असे.
मुअम्मर गद्दाफीची रंगेली
लीबियाचा माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीची ओळखही सेक्ससाठी हापापलेला अशीच होती. असे सांगितले जाते की, तो नेहमीच शाळेत किंवा कॉलेजला भेट देत होता तेव्हा तो ज्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवत असे ती मुलगी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी आणली जात होती. कर्नल गद्दाफीने ४० वर्षे लीबियावर राज्य केलं आणि त्याच्या मृत्यूनंतर अनेक मुलींना त्यांच्यासोबत झालेल्या घटना सांगितल्या होत्या.
एनिक कोजियां नावाच्या एका लेखकाने 'गद्दाफीज हरम' नावाच्या पुस्तकात लिहिले की, जे कुणी गद्दाफीच्या हरममधून बाहेर पडलेल्या मुलींचं सत्य ऐकतील ते हैराण होतील. एनिकच्या पुस्तकात १८ वर्षीय हुदाची कहाणी आहे जिला लालच देऊन गद्दाफीची सेक्स स्लेव बनवण्यात आलं होतं.