दिवसभरात कित्येकदा वापरत असलेल्या 'OK' शब्दाची उत्पत्ती आणि फुल फॉर्म माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 01:01 PM2020-02-21T13:01:54+5:302020-02-21T13:04:33+5:30

OK या शब्दाचा इतिहास जवळपास १८० वर्षे जुना आहे. अनेकजण असं मानतात की, या शब्दाचा शोध चुकीच्या उच्चारामुळे लागला होता.

Do you know What is the full of ok? | दिवसभरात कित्येकदा वापरत असलेल्या 'OK' शब्दाची उत्पत्ती आणि फुल फॉर्म माहीत आहे का?

दिवसभरात कित्येकदा वापरत असलेल्या 'OK' शब्दाची उत्पत्ती आणि फुल फॉर्म माहीत आहे का?

googlenewsNext

OK हा इंग्रजी शब्द आता तर प्रत्येकाच्या बोलण्यात कितीतरी वेळा येत असेल याचा अंदाज नाही. अनेकांना तर ओके म्हणण्याची जणू सवयच लागलेली असते. अनेकजण हा शब्द लिहिताना किंवा बोलताना वापरतात, पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, या OK या अर्थ किंवा फूल फॉर्म काय आहे? चला आज आम्ही तुम्हाला तुम्ही कितीतरी वेळा वापरत असलेल्या शब्दाचा फूल फॉर्म सांगणार आहोत.

Prof. Allen Walker Read यांच्यानुसार, OK शब्दाचा प्रयोग सर्वात पहिल्यांदा १८३९ मध्ये करण्यात आला होता. आणि या शब्दाचा फुल फॉर्म ‘oll korrect’ असा आहे. इतकंच नाही तर OK शब्दाचा केवळ एकच नाही तर आणखीही फुल फॉर्म सांगण्यात आले आहेत.
‘oll korrect’ शिवाय OK चा फुल फॉर्म Objection killed, Old Kinderhook, ग्रीक शब्द Olla kalla म्हणजे all good, O Kendall & Sons जे त्यांच्या प्रॉडक्ट्सवर Initials ‘OK’ करते थे, ‘Ober Kommando’-एक जर्मन General, जे documents साइन करण्यासाठी OK लिहित होते.

कशी झाली या शब्दाची उत्पत्ती?

OK या शब्दाचा इतिहास जवळपास १८० वर्षे जुना आहे. अनेकजण असं मानतात की, या शब्दाचा शोध चुकीच्या उच्चारामुळे लागला होता. पण OK शब्दाची उत्पत्ती व्यंग किंवा गंमत म्हणून झाली होती. १९व्या शतकात या शब्दाचा वापर व्यंग किंवा गंमत म्हणून केला जात होता. नंतर या शब्दाचा सर्वात आधी वापर १८३९ मध्ये ऑफिसमध्ये गंमतीच्या अंदाजात करण्यात आला होता. २ मार्च १८३९ मध्ये एका आर्टिकलमध्ये Oll Korrect या शब्दाचा वापर करण्यात आला.

Oll Korrect हा शब्द All Correct या शब्दाचा चुकीचा उच्चार व्यंगात्मक बोलताना केला जात होता. नंतर हा शब्द संपूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध झाला. नंतर जगभरात याचा वापर केला जाऊ लागला. विकीपिडीयानुसार, OK हा शब्द Ole Kurreck चा शॉर्ट फॉर्म आहे. जो अमेरिकन इंग्रजीतून घेतला आहे. आता तर OK पण शॉर्ट फॉर्म K लोक वापरू लागले आहेत.


Web Title: Do you know What is the full of ok?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.