अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:06 PM2022-02-24T12:06:08+5:302022-02-24T12:15:59+5:30

Why ATM has 4 digit long pin : एटीएममुळे पैसे काढण्यासाठी बँकेतील लांबचलांब रांगेमध्ये थांबणं, पैशांसाठी वाट पाहण्याचा त्रास संपला आहे.

do you know why an atm has 4 digit long pin once it was 6 interesting facts | अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण

अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण

googlenewsNext

नवी दिल्ली - माणसाचं आयुष्य अधिक सुसह्य करण्याचं काम विज्ञानाने केलं आहे. विज्ञानाने लावलेल्या एकापेक्षा एक शोधामुळे आपले जीवन पूर्वीपेक्षा सोयीस्कर झालं आहे. असाच एक शोध म्हणजे एटीएमचा (ATM). एटीएममुळे पैसे काढण्यासाठी बँकेतील लांबचलांब रांगेमध्ये थांबणं, पैशांसाठी वाट पाहण्याचा त्रास संपला आहे. यामुळे बँकेत जाऊन पैसे काढण्यासाठी लागणारा आपला वेळही वाचला आहे. एटीएममधून पैसे काढताना एक चार अंकी पिन (Why ATM has 4 digit long pin) टाकावा लागतो. आज आम्ही तुम्हाला याच एटीएमच्या पिनशी संबंधित महत्त्वाची माहिती देणार आहोत.

बँकिंगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी शोध म्हणजे एटीएम मशीन. हे मशीन जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरॉन (John Shepherd-Barron) या स्कॉटिश शास्त्रज्ञाने शोधलं होतं. विशेष म्हणजे या शास्त्रज्ञाचा जन्म भारतातच शिलाँग शहरात झाला होता. त्यांनीच 1969 साली एटीएम शोधून काढलं, व ते जगभर लोकप्रिय झालं. शेफर्ड यांनी एटीएम मशीन तयार करून त्यात कोडिंग सिस्टिम बसवली, तेव्हा पिन क्रमांक फक्त चार अंकी का ठेवला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुरुवातीला एटीएम पिन 4 अंकांचा असावा, असा शेफर्ड यांचा कोणताही प्लान नव्हता, उलट त्यांना तो 6 अंकी ठेवायचा होता. जेव्हा शेफर्ड यांनी त्यांची पत्नी कॅरोलिनवर हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा पुन्हा ती 6 अंकांपैकी 2 अंक विसरायची. तिला फक्त 4 अंक आठवत होते. त्याच वेळी, शेफर्ड यांनी अंदाज लावला की, मानवी मेंदू सहजपणे 6 ऐवजी 4 अंक लक्षात ठेवू शकतो, व त्यांनी एटीएम पिन चार अंकी ठेवला.

शेफर्ड यांनी जरी एटीएमचा पिन 4 अंकी ठेवला असला तरी तो 6 अंकी ठेवण्यामागचा त्यांचा उद्देश होता तो अधिक सुरक्षित करणे. 4 अंकी एटीएम पिन 0000 ते 9999 या दरम्यानचा असतो. याचाच अर्थ कोणत्याही एटीएमचा पिन हा 10000 भिन्न पिन नंबरपैकी एकच ठेवता येतो, ज्यामध्ये 20 टक्के पिन हॅक केले जाऊ शकतात. अर्थात 4 अंकी पिन सहज हॅक केला जाऊ शकत नसला, तरी तो 6 अंकी पिन पेक्षा कमी सुरक्षित आहे. तसेच, काही देशांमध्ये आजही 6 अंकी एटीएम पिन वापरला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: do you know why an atm has 4 digit long pin once it was 6 interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.