'V' शेपमध्येच का उडतो पक्ष्यांचा ग्रुप? जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:24 PM2023-05-29T16:24:45+5:302023-05-29T16:25:32+5:30
Bird Flying V Shape Theory: वैज्ञानिकही यावर बरीच वर्ष वाद-विवाद करत होते. पण मग नंतर रिसर्चमधून काही मुख्य गोष्टी समोर आल्या. ज्यातून समजलं की, पक्षी सोबत असताना 'V' शेप आकारात का उडतात.
Bird Flying V Shape Theory: तुम्ही आकाशात उडणारे पक्षी नक्कीच पाहिले असतील. तुम्ही कधीना कधी हेही पाहिलं असेल की, काही बरेच पक्षी जेव्हा सोबत आकाशात उडतात तेव्हा 'V' शेप बनवून उडतात. एकामागे एका पक्ष्यांनी अशी लाइन तयार केली असते जी 'V' शेपसारखी दिसते. हेही आश्चर्यकारक आहे की, ते बराच लांब पल्ला या व्ही शेपमध्ये उडत असतात. त्यांच्यात एकमेकांच्या पुढे जाण्याची घाई नसते.
पण तुम्हाला यामागचं कारण माहीत आहे का? वैज्ञानिकही यावर बरीच वर्ष वाद-विवाद करत होते. पण मग नंतर रिसर्चमधून काही मुख्य गोष्टी समोर आल्या. ज्यातून समजलं की, पक्षी सोबत असताना 'V' शेप आकारात का उडतात.
काय आहे यामागचं कारण
आपण आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी बघतो त्या सगळ्यांमागे काहीना काही सायन्स असतं. त्याचप्रमाणे पक्षी जेव्हा आकाशात एकत्र व्ही शेपमध्ये उडतात त्यामागेही सायन्स आहे. रिसर्चमधून समोर आलं आहे की, पक्षी व्ही शेपमध्ये उडतात याची दोन कारणे आहेत. पहिलं म्हणजे व्ही शेपमध्ये उडण्याने त्यांना उडण्यास सोपं जातं. असं केल्याने त्यांच्यात आपसात टक्कर होत नाही.
दुसरी कारण म्हणजे पक्ष्यांच्या टोळीमध्ये एक पक्षी त्यांचा लीडर असतो. तो उडताना आपल्या बाकी सहकाऱ्यांना गाइड करतो. जेव्हा पक्षी सोबत उडतात तेव्हा तो सगळ्यात पुढे असतो. बाकी त्याच्या मागे असतात. अनेक साइंटिस्ट यावर सहमत आहेत.
रिसर्चमधून समोर आली ही बाब
लंडन विश्वविद्यालयाच्या रॉयल व्हेटरनरी कॉलेजच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, पक्षी जेव्हा ग्रुपने व्ही शेपमध्ये उडतात तेव्हा आकाशात उडताना हवेला कापणं सोपं होतं. याने सोबत उडत असलेल्या पक्ष्यांना सोबत उडणं सोपं जातं. असं केल्याने त्यांची बरीच एनर्जीही वाचते. अभ्यासकांनी हेही सांगितलं की, पक्ष्यांमध्ये व्ही शेपमध्ये उडण्याची कला बालपणापासून नसते. ते ग्रुपमध्ये राहता राहता शिकतात.