भारतात दोषीला फाशी देण्याआधी 'गंगाराम'ला फासावर का लटकवतात? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 03:08 PM2021-07-02T15:08:06+5:302021-07-02T15:11:18+5:30
जेलरपासून जल्लादापर्यंत प्रत्येकजण या प्रक्रियेसाठी स्वत:ला मानसिक रूपाने तयार करतात. तुरूंग प्रशासनाकडून जल्लादाला फाशीच्या काही वेळाआधी अल्टीमेटम दिला जातो.
(Image Credit : patrika.com)
भारतात एखाद्या गुन्हेगाराला फाशी देण्याआधीची प्रक्रिया फारच लांबलचक असते. यादरम्यान तुरूंग प्रशासनाला अनेक प्रकारच्या तयारी कराव्या लागतात. जेलरपासून जल्लादापर्यंत प्रत्येकजण या प्रक्रियेसाठी स्वत:ला मानसिक रूपाने तयार करतात. तुरूंग प्रशासनाकडून जल्लादाला फाशीच्या काही वेळाआधी अल्टीमेटम दिला जातो.
२५ ऑक्टोबर १९७८ ला रायपूरच्या तुरूंगात फाशीची प्रक्रिया आपल्या डोळ्याने पाहणारे पत्रकार गिरिजाशंकर यांनी त्यांचं पुस्तक 'आंखों देखी फांसी' मध्ये लिहिलं की, मी रायपूरच्या तुरूंगा 'बैजू' नावाच्या दोषीला देण्यात आलेली फाशीची प्रक्रिया पाहिली होती. यादरम्यान बैजूच्या फाशीसाठी एक लाकडाचा पुतळा तयार केला होता, ज्याचं नाव 'गंगाराम' ठेवलं होतं.
यादरम्यान जेव्हा तुरूंग प्रशासनाला विचारण्यात आलं की, पुतळ्याचं नाव 'गंगाराम' हेच का ठेवलं गेलं. तर यावर तुरूंगाचे अधीक्षक म्हणाले होते की, ही प्रक्रिया बऱ्याच वर्षांपासून चालत आली आहे. भारतात कोणत्याही मृतकासाठी भगवान राम आणि गंगाजलाचं फार महत्व मानलं जातं. त्यामुळे पुतळ्याचं नाव 'गंगाराम' ठेवलं गेलं होतं. (हे पण वाचा : ब्लू व्हेलच्या हृदयाचं वजन किती असतं? आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी...)
दोषीआधी गंगारामला का फाशी दिली जाते?
भारतात कोणत्याही दोषीला फाशी देण्याआधी एका पुतळ्याला फाशी दिली जाते. याच पुतळ्याचं नाव गंगाराम असतं. दोषीला फाशी देण्याआधी दोरी चेक करण्यासाठी गंगारामला फाशी दिली जाते. या पुतळ्याचं वजन दोषीच्या वजनापेक्षा दीड पटीने जास्त असतं. डमीची फाशी यशस्वी झाल्यानंतर त्याच दोराने आणि ड्रिलनुसार खऱ्या दोषीला फाशी दिली जाते.
कशी असते फाशीची प्रक्रिया?
तुरूंगाच्या मॅन्युअलनुसार, कोणत्याही गुन्हेगाराला फाशी सूर्योदयानंतरच दिली जाते. सामान्यपणे उन्हाळ्यात सकाळी ६ वाजता आणि हिवाळ्यात सकाळी ७ वाजता फाशी दिली जाते. फाशी घरात आणल्यावर आधी दोषीला सकाळी ५ वाजता आंघोळ घालवली जाते. त्यानंतर त्याला नवे कपडे दिले जातात. नंतर चहा दिला जातो. दोषीला नाश्त्यासाठी विचारलं जातं. त्याने मागितला तर दिला जातो. (हे पण वाचा : एक असं गाव जिथे कधीच पाऊस पडत नाही, कारण वाचून व्हाल अवाक्...)
यानंतर मॅजिस्ट्रेट दोषीला त्याची शेवटची इच्छा विचारतात. नंतर दोषीला काळा मास्क लावून आणि त्याचे हात मागे बांधून त्याला फाशी दिली जाते. हे सगळं काम जल्लाद करतो. फाशी देताना कोणताही आवाज होऊ नये यासाठी पूर्ण बंदोबस्त केला जातो. जेव्हा फाशी देण्याची वेळ येते तेव्हा इशारा देण्यासाठी एक रूमाल खाली पाडला जातो आणि जल्लाद लिव्हर खेचतो. ही सगळी कामे इशाऱ्यात केली जातात.