गोळ्यांच्या पाकिटावर लाल रंगाची रेषे का असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:28 PM2023-05-04T14:28:31+5:302023-05-04T14:47:48+5:30
Interesting Facts : बरेच लोक गोळ्यांची पॅकेट आणतात आणि बिनधास्त घेतात. पण ते कधीच औषधांचं पाकीट बारकाईने किंवा त्यावरील गोष्टी बारकाईने बघत नाहीत. याने समस्या होऊ शकते.
Interesting Facts : आजकाल कुणीही आजारी पडले की, लोक थेट मेडिकलमध्ये जातात आणि त्यांना जी नावे माहीत आहेत ती औषधं घेऊन येतात. ते याची जराही याची आवश्यकता समजत नाही की, त्यांनी डॉक्टरांशी बोलून औषधं घेतली पाहिजे. असं करून ते त्यांचंच आरोग्य धोक्यात टाकतात. बरेच लोक गोळ्यांची पॅकेट आणतात आणि बिनधास्त घेतात. पण ते कधीच औषधांचं पाकीट बारकाईने किंवा त्यावरील गोष्टी बारकाईने बघत नाहीत. याने समस्या होऊ शकते.
तुम्ही कधी लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की, कही गोळ्यांच्या स्ट्रीपवर लाल रंगाची रेष असते. पण याचा अर्थ काय होतो हे माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊन या लाल रेषेचा अर्थ....
लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगलं माहीत असतं. पण सर्वसामान्य लोकांना याची काहीच माहिती नसते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येत. अॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.
लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.
तर औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात ज्यांना नशेच्या औषधांचं लायसन्स असतं.
काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल.