माहितीये ट्रेनच्या अखेरच्या डब्यावर X असं चिन्ह का असतं? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 10:33 AM2023-03-07T10:33:36+5:302023-03-07T10:34:03+5:30
मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या शेवटच्या डब्याच्या मागे क्राॅस किंवा इंग्रजी अक्षर X असे लिहिलेले असते.
रेल्वेतून दरराेज लाखाे प्रवासी प्रवास करतात. मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या शेवटच्या डब्याच्या मागे क्राॅस किंवा इंग्रजी अक्षर X असे लिहिलेले असते. अनेकांना प्रश्न पडताे, हे का लिहिले असावे? तर खुद्द रेल्वे मंत्रालयानेच याचे उत्तर दिले आहे.
गाडीच्या शेवटच्या डब्याच्याच मागेक्राॅसचे चिन्ह असते. यातून रेल्वे कर्मचाऱ्यांना एक संकेत दिला जाताे. हे चिन्ह दिसले म्हणजे संबंधित गाडी पूर्णपणे गेलेली आहे. मधूनच काही डबे वेगळे झालेले नाहीत वा गाडीचा अपघातही झालेला नाही. एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकापर्यंत सुरक्षितरीत्या गाडी पाेहाेचली आहे, असा अर्थ या चिन्हातून मिळताे. रेल्वे कर्मचारी प्रत्येक स्थानकावर या चिन्हाकडे लक्ष ठेवून असतात. मालगाडीबाबत बाेलायचे झाल्यास गाडीच्या शेवटचा डबा हा गार्डचा असताे. ताे सुरक्षित असल्यास संपूर्ण गाडी व्यवस्थित असल्याचे कळते.