ऑपरेशन थिएटरमध्ये 'थिएटर' शब्दाचा वापर का केला जातो? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 04:43 PM2021-08-24T16:43:29+5:302021-08-24T16:45:17+5:30

२०व्या शतकात ऑपरेशन किंवा सर्जरी फारच अवघड काम मानलं जात होतं. या काळात रूग्णाला बेशुद्ध किंवा गुंगीचं औषध न देताच ऑपरेशन केलं जात होतं.

Do you know why the word theatre is used in the operation theater | ऑपरेशन थिएटरमध्ये 'थिएटर' शब्दाचा वापर का केला जातो? जाणून घ्या कारण....

ऑपरेशन थिएटरमध्ये 'थिएटर' शब्दाचा वापर का केला जातो? जाणून घ्या कारण....

googlenewsNext

ऑपरेशन थिएटर ती जागा असते जिथे मनुष्याला दुसरं जीवन मिळतं. यादरम्यान डॉक्टर रूग्णासाठी देवदूत बनतात आणि त्यांचा जीव वाचवतात. 'ऑपरेशन थिएटर'ला हिंदीत शल्य चिकित्सा प्रेक्षागार किंवा शल्य चिकित्सा रंगमंच म्हणतात. पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रत्न केला का की, ऑपरेशन रूमला ऑपरेशन थिएटर का म्हणतात? अखेर या थिएटर शब्दाचा वापर का होतो?

२०व्या शतकात ऑपरेशन किंवा सर्जरी फारच अवघड काम मानलं जात होतं. या काळात रूग्णाला बेशुद्ध किंवा गुंगीचं औषध न देताच ऑपरेशन केलं जात होतं. २१व्या शतकात भलेही गोष्टी सोप्या झाल्या असतील. पण अजूनही अडचणी येतातच. पण सर्जरी दरम्यान आधीही रूग्णाचा जीव धोक्यात असायचा आणि आताही राहतो.

२०व्या शतकाच्या सुरूवातीपासून हॉस्पिटल्समध्ये ऑपरेशन थिएटर एकदम फिल्म थिएटरसारखेच बनवले जात होते. असं यासाठी केलं जात होतं कारण त्यावेळी मेडिकल विद्यार्थ्यांना आणि नर्सेसना सर्जरी बघण्यासाठी आमंत्रित केलं जात होतं. सर्जरी कशाप्रकारे होते हे बघण्यासाठी लोक ऑपरेशन थिएटरला जात होते. प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्थित सीट असायच्या. यावेळी असं वाटायचं की, लोक सर्जरी नाही तर सिनेमा बघण्यासाठी आले आहेत.

यामागचं एक कारण असंही होतं की, त्यावेळी जेव्हा एखाद्या नवख्या डॉक्टरला सर्जरीची जबाबदारी दिली जात होती, तेव्हा विशेष चिकित्सा दलासाठी प्रेक्षागारमध्ये बसण्याची व्यवस्था केली जात होती. यावेळी प्रोफेशनल आणि अनुभवी डॉक्टरांचा हा दल चुकांवर लक्ष ठेवत होता. ऑपरेशन करत असताना ज्युनिअरसोबत एक सिनिअर डॉक्टरही राहत होता. 

ऑपरेशन दरम्यान सर्वात हैराण करणारी बाब ही असायची की, ही संपूर्ण प्रक्रिया बघण्यासाठी हॉस्पिटल बाहेर मेडिकल विद्यार्थी आणि नर्सेसना आमंत्रित केलं जात होतं. प्रेक्षक गोलाकार हॉलमध्ये बसून सर्जरी बघत होते. सुरुवातीच्या दिवसात ऑपरेशन थिएटर लहान होते. नंतर ते मोठे होत गेले. यात बाहेरील लोकांनाही बसण्याची परवानगी मिळू लागली होती. पण हे प्रत्येक रूग्णाबाबत होत नव्हतं. २०व्या शतकात ऑपरेशन रूम्सना ऑपरेशन थिएटर म्हटलं जात होतं. आजच्या काळात ऑपरेशन थिएटरमध्ये केवळ डॉक्टर आणि सहकारी असतात.
 

Web Title: Do you know why the word theatre is used in the operation theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.