कडक सॅल्यूट! ड्यूटी दरम्यान अचानक बेशुद्ध पडले डॉक्टर, शुद्धीवर येताच लगेच रूग्णांच्या सेवेला लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:20 AM2021-05-06T10:20:44+5:302021-05-06T10:26:04+5:30

Coronavirus News : डॉक्टर जगदीश जोशी ऋषिकेशमध्ये ऋषिलोकच्या एका कोविड सेंटरमध्ये आपली ड्यूटी करत होते. अचानक काम करता करता ते बेशुद्ध होऊन खाली पडले.

Doctor fainted during patient treatment rishikesh | कडक सॅल्यूट! ड्यूटी दरम्यान अचानक बेशुद्ध पडले डॉक्टर, शुद्धीवर येताच लगेच रूग्णांच्या सेवेला लागले

कडक सॅल्यूट! ड्यूटी दरम्यान अचानक बेशुद्ध पडले डॉक्टर, शुद्धीवर येताच लगेच रूग्णांच्या सेवेला लागले

googlenewsNext

कोरोना (Coronavirus) काळात हेल्थ वर्कर्स (Health Workers) आपल्या जीवाची पर्वा न करता पहिल्या रांगेत उभे राहून लोकांची जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. सुट्टी न घेता, आराम न करता देशभरातील डॉक्टर्स-नर्सेस आणि आरोग्यकर्मी आपली ड्यूटी करत आहेत. उत्तराखंडच्या (Uttarakhand) ऋषिकेशमध्ये तर एका डॉक्टरांनी आपल्या डेडिकेशनचं उदाहरण समोर ठेवलं आहे. डॉक्टर जगदीश जोशी (Dr. Jagdish Joshi Corona Yodha) ऋषिकेशमध्ये ऋषिलोकच्या एका कोविड सेंटरमध्ये आपली ड्यूटी करत होते. अचानक काम करता करता ते बेशुद्ध होऊन खाली पडले.

अशात तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उचलून बेडवर ठेवलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. बऱ्याच वेळाने डॉ. जगदीश शुद्धीवर आले. त्यांना आरामाची जास्त गरज होती. मात्र, त्यांनी आराम करण्याऐवजी रूग्णांवर उपचाराला महत्व दिलं. ते शुद्धीवर येऊन लगेच रूग्णांच्या सेवेला लागले. (हे पण वाचा : नुकत्याच बऱ्या झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी; समोर आला मन हेलावून टाकणारा फोटो)

केवळ २७ वय असलेले डॉक्टर जगदीश जोशी ज्याप्रकारे आपल्या जीवाची, तब्येतीची पर्वा न करता रूग्णांची सेवा करत आहेत ते बघून लोकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोक डॉक्टर जगदीश यांच्या जिद्दीला सलाम करत आहे. काही डॉक्टर्स कोरोना महामारीतही पैशांना महत्व देताना दिसतात. अशात त्यांनी डॉक्टर जगदीश यांचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवलं तर किती बरं होईल. नाही का?
 

Web Title: Doctor fainted during patient treatment rishikesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.