डॉक्टर पती-पत्नीचा वाद चव्हाट्यावर, म्हणाली - पतीने दगा दिला; मेडिकल कॉलेजमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 11:39 AM2022-02-12T11:39:32+5:302022-02-12T11:41:28+5:30

पत्नी रेणु प्रभाने मीडियासोबत बोलताना आरोप लावला की, कटिहार मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करणारा तिचा पती संतोष आता तिला पत्नी मानण्यास नकार देत आहे.

Doctor husband wife relation conflict high voltage drama in Katihar medical college | डॉक्टर पती-पत्नीचा वाद चव्हाट्यावर, म्हणाली - पतीने दगा दिला; मेडिकल कॉलेजमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

डॉक्टर पती-पत्नीचा वाद चव्हाट्यावर, म्हणाली - पतीने दगा दिला; मेडिकल कॉलेजमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Next

जसजसा व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे त्यासंबंधी अनेक घटना समोर येत आहेत. कुणी पार्टनरला दगा देत आहे तर कुणाला प्रेम मिळत आहे. बिहारच्या (Bihar) कटिहारमधून (Katihar) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे डॉक्टर पती-पत्नीच्या नात्यातील वाद रस्त्यावर आला आहे. एकीकडे महिला डॉक्टर पतीचं प्रेम मिळवण्यासाठी महिला संघटनांसोबत संघर्ष करत आहे. तर डॉक्टर पतीने आपल्या पत्नीला स्वीकारण्यास नकार दिला. कोलकाताहून कटिहारला पोहोचलेल्या महिला डॉक्टर पती-पत्नीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.

पत्नी रेणु प्रभाने मीडियासोबत बोलताना आरोप लावला की, कटिहार मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करणारा तिचा पती संतोष आता तिला पत्नी मानण्यास नकार देत आहे. पत्नीचा आरोपी आहे की, गेल्या पाच वर्षापासून हे असंच सुरू आहे. त्यांना एक मुलगाह आहे. ज्याकडे डॉक्टर दुर्लक्ष करत आहे. रेणु प्रभा दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. पत्नीचा आरोप आहे की,  डॉक्टर संतोषचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे. त्यामुळे तो तिला स्वीकारत नाहीये.

दरभंगाहून कटिहार आलेल्या रेणु प्रभाने मेडिकल कॉलेजमध्ये चांगलाच गोंधळ घातला. पण डॉक्टर संतोषने पत्नीला तेथून पळवून लावलं. डॉक्टर रेणु प्रभा महिला विकास मंच कोलकाताच्या मदतीने कटिहार मेडिकल कॉलेजमध्ये पोहचली होती. ती पतीकडे तिचा अधिकार मागण्यासाठी आली होती. पण डॉक्टर काहीही ऐकायला तयार नव्हता. पत्नी रेणुने आता डॉक्टर संतोषवर मारहाण करण्याचाही आरोप लावला आहे. आणि आता ती कोर्टात जाण्यसाठी तयार आहे. व्हॅलेंटाईन वीक दरम्यान घडलेली ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.
 

Web Title: Doctor husband wife relation conflict high voltage drama in Katihar medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.