पोट दुखत असल्याने डॉक्टरांनी केलं ऑपरेशन, आत सापडली अख्खी काकडी; रूग्णाचं उत्तर ऐकून डॉक्टर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 02:57 PM2023-03-30T14:57:08+5:302023-03-30T14:58:29+5:30
40 वर्षीय एक रूग्ण पोटदुखीची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तो म्हणाला की, त्याला व्यवस्थित चालता येत नाहीये, याचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं.
Man With Cucumber Stuck In Stomach: कधी कधी लोक असे काही कारनामे करतात, मग डॉक्टरांकडे जाऊन रडतात. अशीच एक कोलंबियामधील अजब घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या, मग तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा तेव्हा त्याच एक्स-रे काढण्यात आला. डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन करण्यास सांगितलं. जेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन केलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांना पोटात एक मोठी अख्खी काकडी दिसली. जेव्हा डॉक्टरांनी विचारलं की, काकडी पोटात कशी आली तर त्याने सांगितलं की, काकडी आतच उगवली.
40 वर्षीय एक रूग्ण पोटदुखीची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तो म्हणाला की, त्याला व्यवस्थित चालता येत नाहीये, याचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं. जेव्हा डॉक्टरांनी टेस्ट केली तेव्हा एक्स-रेमध्ये त्यांना पार्श्वभागात एक वस्तू अडकलेली दिसली. डॉक्टरांनी ती वस्तू काढण्यासाठी त्याला बेशुद्ध केलं. तेव्हा समोर आलं की, ही काकडी होती. ऑपरेशननंतर व्यक्ती डॉक्टरांना म्हणाला की, त्याला नाही माहीत की, काकडी त्याच्या शरीरात कशी अडकली. त्याने दावा केला की, काकडीच्या बियांमुळे त्याच्या पोटात काकडी विकसित होऊ शकते. कारण तो खूप काकड्या खातो.
डॉक्टरांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याला घरी परत पाठवलं. अशीच एक घटना आधीही समोर आली होती. व्हेनेजुएलाच्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागात एक बीअरची बॉटल अडकली होती. ज्यामुळे त्याचं इमरजन्सी ऑपरेशन करण्यात आलं होतं. 79 वर्षीय व्यक्तीने दावा केला होता की, चोरांनी ही बॉटल त्याच्या पार्श्वभागात टाकली होती. ते त्याच्या घरी चोरी करण्यासाठी आले होते. तीन लोक घरात घुसून आले होते आणि काहीच न सापडल्याने ते संतापले होते. एक्स-रे मध्ये त्याच्या पार्श्वभागात बॉटल दिसून आली होती.
इतकंच नाही तर काही दिवसांआधी नेपाळमधील एका 47 वर्षीय व्यक्तीने असाच कारनामा केला. नशेत असताना त्याने असं काही केलं की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. या व्यक्तीने त्याच्या पार्श्वभागात स्टीलचा ग्लास टाकला होता. त्याचं ऑपरेशन करून तो ग्लास काढण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीच्या पार्श्वभागात तीन दिवस ग्लास अडकून होता.